JSP291_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JSP291_txt.txt
JSP291_txt.txt

JSP291_txt.txt

sakal_logo
By

बेकायदेशीर नळ कनेक्शनची
जयसिंगपुरात शोधमोहीम

पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर ः उत्पन्न वाढीवर लक्ष

गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर, ता. ३०ः शहरातील मिळकतींच्या कर निश्चितीकरणात छुप्या मिळकती उघड होत असताना बेकायदेशीर नळ कनेक्शनचा नवा मुद्दा पुढे आला आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शनप्रश्नी आता पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. अशा नळ कनेक्शनची शोधमोहीम पालिका प्रशासनाकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे कर न भरणाऱ्या नळ कनेक्शनधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मिळकतींचे खासगी कंपनीद्वारे कर निश्चितीकरण केले जात आहे. यात मोठ्या प्रमाणात छुप्या मिळकती आढळून येत आहेत. यानंतर आता पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कर न भरणाऱ्या मिळकती उघड होत असताना पालिकेच्या उत्पन्नावर चांगला परिणाम होणार असून कोट्यवधी रुपयांच्या महसुलात भर पडणार आहे. याशिवाय बोगस नळ कनेक्शनमुळेही करवाढ होणार आहे. शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण खासगी कंपनीमार्फत होत असल्याने याला कृती समितीची स्थापना करून याला विरोध करण्यात आला आहे.
कृती समितीच्या माध्यमातून विरोध करताना पालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन कैफियत मांडण्यात आली. या सगळ्या प्रकारातही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर शहरात सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील काही भागांचा अपवाद वगळता सर्वेक्षण करण्यात आले. शाहूनगरसह काही भागात याला विरोधही झाला. मात्र, कृती समितीच्या आंदोलनाची धार नंतरच्या काळात बोथट झाल्याने विरोध मावळत गेला.
खासगी कंपनीच्या सर्वेक्षणात शहरातील छुप्या मिळकती उघड होत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब जमेची ठरली आहे. छुप्या मिळकती उघड होत असताना आता पालिकेचा पाणीपुरवठा विभागही आता अॅक्शन मोडवर आला आहे. छुप्या मिळकतींची पाणीपुरवठा विभागाच्या वतीनेही तपासणी केली जाणार आहे.
....


कारवाई काय होऊ शकते?

पाणी पुरवठा विभागाच्या वतीने बेकायदा नळ कनेक्शन शोध मोहिमेत आढळणाऱ्या नळ कनेक्शनधारकांवर एक कालावधी निर्धारित करून त्या काळाचा दंड वसूल केला जाऊ शकतो. नंतरच्या काळात कनेक्शन अधिकृत करून रीतसर पाणीपट्टी वसुली केली जाऊ शकेल.
....

‘शहरात मिळकतींचे सर्वेक्षण केले जात आहे. याअंतर्गत छुप्या मिळकती उघड होत आहेत. आता बेकायदा नळ कनेक्शन शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे. यातून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे.

- तैमूर मुल्लाणी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर पालिका