विद्यार्थ्यांनो, स्वत:चा शोध घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनो, स्वत:चा शोध घ्या
विद्यार्थ्यांनो, स्वत:चा शोध घ्या

विद्यार्थ्यांनो, स्वत:चा शोध घ्या

sakal_logo
By

विद्यार्थ्यांनो, स्वत:चा शोध घ्या
इंद्रजित देशमुख : शिंदे प्रशालेचे संयुक्त कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वत:चा शोध घेतला तरच आयुष्यात क्रांती घडवता येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रतिक्षा खाडे हिला आदर्श खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले. सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय खेळाडूंचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी संस्थेचे काळजीवाहू व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्‍घाटन सिद्धकला नृत्य मंदिराचे प्राचार्य हृदयनाथ चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी कथ्थक नृत्याचा आविष्कार दाखवून नृत्याची माहिती दिली. फनी गेम्स, खाद्य महोत्सव, रांगोळी प्रदर्शन, हस्तलिखित, इंग्लिश कॉर्नरचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. एस. एन. खोराटे, बी. जी. काटे, सुभाष धुमे, राजेंद्र खोराटे, रेखा पोतदार, राम मजती, एस. के. डोंगरे, आर. बी. शिंत्रे, एस. डी. चौगुले, पी. वाय. पवार आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांनी स्वागत केले. ए. जे. हराडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आर. बी. माने, एम. ए. पोवार यांनी क्रीडा अहवालाचे वाचन केले. सौ. एन. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. चोथे यांनी आभार मानले.