कौलगेच्या विद्यार्थ्यांनी केली आई-वडील, गुरुंची पाद्यपुजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलगेच्या विद्यार्थ्यांनी केली आई-वडील, गुरुंची पाद्यपुजा
कौलगेच्या विद्यार्थ्यांनी केली आई-वडील, गुरुंची पाद्यपुजा

कौलगेच्या विद्यार्थ्यांनी केली आई-वडील, गुरुंची पाद्यपुजा

sakal_logo
By

gad304.jpg
72057
कौलगे : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पालकांची पाद्यपूजा करताना विद्यार्थी.
---------------------

कौलगेच्या विद्यार्थ्यांनी केली
आई-वडील, गुरूंची पाद्यपूजा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आई-वडील, गुरूंची पाद्यपूजा केली. गावात प्रथमच झालेल्या या कार्यक्रमाने पालक भारावून गेले. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. कणेरी मठाचे योगशिक्षक दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
श्री. पाटील म्हणाले, की आई-वडील व मुलांमध्ये व्यावहारिक नाते न राहता भावनिक नाते बनले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी वेळ द्यायला हवा. कारण, तीच खरी संपत्ती आहे. आई-वडिलांची मान शरमेने खाली जाईल, असे कोणतेही कृत्य मुलांनी करू नये. मुलांनी आपल्या पालकांची व गुरूंची पाद्यपूजा केली. या वेळी मुलांसह पालकांच्याही डोळ्यांत अश्रू आले.
पालक महादेव केसरकर, संजय पोवार, शंकर केसरकर, सागर पाटील यांची भाषणे झाली. स्वाती पाटील, सुनील माने, बळिराम पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, नामदेव यादव, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर यांनी परिश्रम घेतले. विश्वजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. इनामदार यांनी आभार मानले.