युवासेना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवासेना निवेदन
युवासेना निवेदन

युवासेना निवेदन

sakal_logo
By

72086
....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेमिस्टर
पुढे ढकलण्याची युवासेनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः जगभरात वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिवाजी विद्यापीठातर्फे घेतली जाणारी जानेवारीमधील सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी युवासेनेने आज केली. शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. युवासेनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांना काही काळ गेटवर अडविण्यात आले. त्यानंतर रजिस्ट्रार व्ही. एन. शिंदे यांनी बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनामध्ये युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर युवा अधिकारी वैभव जाधव, शहर समन्वयक अवढेश करंबे, उपशहर युवाअधिकारी रघू भावे, प्रतीक भोसले, विभाग अधिकारी विनय शिंदे, विद्यार्थी सुशांत यादव, आदित्य जाधव, शुभम माळी, मनोज पाटील, प्रतीक्षा पाटणकर उपस्थित होते.