साई हायस्कूलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साई हायस्कूलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
साई हायस्कूलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

साई हायस्कूलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

साई हायस्कूलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर, ता. ३० : सातारा येथे झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सांगली संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या साई हायस्कूल संघाने एकतर्फी विजय मिळवला. साई हायस्कूलची सलग तिसऱ्यांदा राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समिधा चौगुल वूमन ऑफ सीरिज या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर श्रावणी पाटील ही ‘बेस्ट बॉलर’चा बहुमान मिळाला. या दोघीची ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघातील खेळाडू अशा : श्रेया पांचाळ, तनुजा कदम, ज्ञानेश्‍वरी पाटील, साक्षी पाटील, पूर्वा चौगुले, परिणिती पाटील, सुहानी कहांडळ, साक्षी बिराजदार, धनश्री कांबळे, समिक्षा पाटील, प्राची कांबळे, सादिया पटेल, वैष्णवी धनगर, निकिता गायकवाड या विजयी संघाचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, प्राचार्य एस. पी. पाटील, क्रीडा मार्गदर्शक सरदार पाटील, विनायक पवार यांनी अभिनंदन केले.