कोल्हापुरकडून यवतमाळ, रत्नागिरीचा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरकडून यवतमाळ, रत्नागिरीचा पराभव
कोल्हापुरकडून यवतमाळ, रत्नागिरीचा पराभव

कोल्हापुरकडून यवतमाळ, रत्नागिरीचा पराभव

sakal_logo
By

72153
कोल्हापूर : ‘कोर्ट प्रीमियर लीग’ राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी दोन्ही सामन्यांत कोल्हापूर (अ) संघाचा खेळाडू अभिजित मोरे याने ‘सामानावीर’चा बहुमान मिळविला.

कोल्हापूरकडून यवतमाळ, रत्नागिरीचा पराभव
कोर्ट प्रीमियर लीग; अभिजित मोरे दोन्ही सामन्यांत ‘सामनावीर’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : ‘कोर्ट प्रीमियर लीग’ राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज कोल्हापूर ‘अ’ संघाने यवतमाळ व रत्नागिरी संघांचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ज्युडीशियल एम्प्लॉईज स्पोर्टस्‌ क्लब (कोल्हापूर) यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोल्हापूर (अ) संघाच्या अभिजित मोरेने दोन्ही सामन्यांमध्ये ‘सामनावीर’चा बहुमान मिळवला.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा कालपासून कोल्हापुरात सुरू झाल्या आहेत. राज्यातील एकूण ३६ संघांनी सहभाग घेतला असून, कोल्हापुरातील पाच मैदानावर एकाच वेळी सामने सुरू आहेत. शास्त्रीनगर मैदान येथील सामन्यात कोल्हापूर (अ) संघाने यवतमाळचा आठ गडी राखून पराभव केला. कर्णधार संजय पाटील आणि शिवानंद करवडे यांनी विजयास हातभार लावला. नाशिक व ठाणे यांच्यात झालेल्या सामन्यात नाशिकने ठाण्याचा सात गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या सामान्यात कोल्हापूर (अ) संघाने रत्नागिरीचा पाच गडी राखून पराभव केला. तसेच, ठाणे संघाने हिंगोलीचा पंचवीस धावांनी, तर सातारा विरुद्ध हिंगोली सामन्यात साताऱ्याने दहा गडी राखून विजय मिळवला. यवतमाळ संघाने नांदेड संघाचा ३२ धावांनी पराभव केला.
शाहूपुरी जिमखाना येथे झालेल्या सामन्यात मुंबई लघुवाद न्यायालय संघाने पुणे संघाचा पाच गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जळगावने पालघरवर पाच गडी राखून विजय मिळवला. वर्धा व रायगड यांच्यातील सामन्यात वर्धा संघाने १२ धावांनी रायगडचा पराभव केला. पुणे संघाने पालघरवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तसेच, उस्मानाबाद संघाने संभाजीनगर जिल्हा न्यायालय संघाचा सहा गडी राखून, तर जळगाव संघाने मुंबईला संघाचा सात गडी राखून पराभव केला. रोहित फातले, सागर पाटील, राकेश कांबरे, चेतन जाधव यांनी येथील संयोजन केले.
कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावरील सामन्यात अमरावती संघाने गडचिरोली संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला. सांगली संघाने कोल्हापूर (ब) संघाचा सहा गडी राखून पराभव केला. लातूर संघाने मुंबई उच्च न्यायालय संघाचा नऊ धावांनी पराभव केला. कोल्हापूर (ब) संघाने नंदुरबार वर नऊ गडी राखून विजय मिळवला. मुंबई उच्च न्यायालय संघाने गडचिरोली संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. सांगली संघाने बीडचा १४ धावांनी पराभव केला.
दुधाळी पॅव्हेलियन येथे झालेल्या सामन्यात अकोल्याने चंद्रपूरचा सहा धावांनी पराभव केला. वाशिम संघाने गोंदियाचा २९ धावांनी पराभव केला. बुलढाणा संघाने परभणी संघावर २५ धावांनी विजय मिळवला. गोंदिया संघाने चंद्रपूर वर पाच धावांनी विजय मिळवला. अकोला संघाने वाशिम संघावर सात धावांनी विजय मिळवला.
----------------
चौकट
यांचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
आजच्या सामन्यात कोल्हापूर ‘अ’, रत्नागिरी, संभाजीनगर उच्च न्यायालय, बुलढाणा, सातारा, नाशिक, वाशिम, अकोला, अहमदनगर, सोलापूर, वर्धा, रायगड, सांगली, बीड, पुणे, जळगाव, लातूर, मुंबई उच्च न्यायालय या संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
-----------------
सोलापूर संघाचे एकाच दिवशी तीन सामने
मेरी वेदर मैदान येथे झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने नागपूर संघाचा सहा गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात सोलापूर संघाने मुंबई सिटी सिव्हिल संघाचा सात गडी राखून पराभव केला. तिसऱ्या सामन्यात अहमदनगर संघाने सोलापूर वर सात गडी राखून विजय मिळवला. सोलापूर संघाच्या आज एकाच दिवशी तीन सामने झाले.