
आजरा ः सामाजिक सलोख्यासाठी निवेदन
आजऱ्यात सामाजिक सलोख्यासाठी निवेदन
आजरा, ता. 30 ः येथील रामतीर्थ तीर्थक्षेत्रावरील प्रकारामुळे विशिष्ट समाजाची बदनामी होत आहे. सामाजिक एेक्य कायम ठेवावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे. आजरा शहर जरी संवेदनशील म्हणून आेळखले जात असले तरी शहरात विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने रहात आहेत. प्रत्येक धर्मातील माणस एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. मात्र काही धर्मांध ठेकेदार जाणून बुजून काही मुद्दे काढून एका विशिष्ट समजाला बदनाम करण्याचे काम करीत आहे. रामतीर्थावर ज्यांचे बालपण, तारुण्य व आयुष्य गेले अशांना टार्गेट केले जात आहे. यामुळे आजरा शहरातील सामाजिक वातावरण दूषीत केले जात आहे. काहींनी आपली य़ेथे ठेकेदारी चालू रहावी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच वेसण घालून सामाजिक सलोखा, साैर्द्या बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर जुबेर माणगावकर, इरफान काझी, जुबेर सोनेखान, नबीसाब खलीफ, अमजद माणगावकर, मोईन काकतीकर, बबलु मुल्ला, महमदनईम मुल्ला, इस्माईल माणगावकर, सादिक नेसरीकर यांच्यासह 92 जणांच्या सह्या आहेत.