चौंडेश्‍वरी देवी शाकंभरी उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौंडेश्‍वरी देवी शाकंभरी उत्सव
चौंडेश्‍वरी देवी शाकंभरी उत्सव

चौंडेश्‍वरी देवी शाकंभरी उत्सव

sakal_logo
By

72167
कोल्हापूर : श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा महोत्सवानिमित्त उत्सवमूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूकप्रसंगी भाविक.
-------------------------------

चौंडेश्वरीदेवी पौष पौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ

विविध धार्मिक कार्यक्रम; दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन

कोल्हापूर, ता. ३० : मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिर येथील श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा महोत्सवाला (शाकंभरी नवरात्र महोत्सव) आजपासून प्रारंभ झाला. हा महोत्सव आठ जानेवारीपर्यंत असेल. सकाळी ८ ते ९ वेळेत पालखी मिरवणूक काढली. सुहासिनींमार्फत जलकुंभ आणि उत्सव मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूक पार पडली. मिरवणुकीत कावणे (ता. राधानगरी) येथील विठ्ठल भक्तांनी वारकरी दिंडी स्वरूपात श्री चौंडेश्वरी देवीची पालखी कोष्टी गल्ली, देवणे गल्ली, तस्ते गल्ली, मंडलिक गल्ली भागातून मंदिरापर्यंत नेली. हा सोहळा रमणीय झाला.
सकाळी ९ ते १० वेळेत पारायण सोहळा रंगला. यामध्ये ज्ञानेश्वर माउली आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शंकरराव कांबळे (अण्णा) यांच्या पारायणाला प्रारंभ झाला. १०० हून अधिक भाविकांनी सामुदायिक पारायाणमध्ये सहभागी झाले. दुपारी तीन वाजता श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन झाले. यात ५० पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती नोंदविली. सायंकाळी साडेसहा वाजता माजगावच्या विठ्ठल भजनी मंडळाच्या बालकलाकारांचे सुश्राव्य भजन झाले. धनाजी खोत यांनी नियोजन केले. उद्या (ता. ३१) श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, सोंगी भजन आदी कार्यक्रम होतील. श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्‍वरी मंदिर व बोर्डिंगने कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.