निविदेला ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निविदेला ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
निविदेला ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

निविदेला ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

महापालिका वापरणे
--------------
निविदेला ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
इचलकरंजीत महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण
इचलकरंजी, ता. ३० ः शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी पुन्हा निर्बिजीकरण मोहिम महापालिकेने हातात घेतली आहे. त्यानुसार १५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची ई- निविदा काढली होती. पण मुदतीत एकही निविदा भरलेली नाही. परिणामी, ९ जानेवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
शहरात सुमारे ४ हजार भटकी कुत्री आहेत. त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्यानंतर महापालिका प्रशासनाने १५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फक्त नर कुत्र्याचीच शस्त्रक्रिया करण्यात येत होती. मात्र यावेळी नर आणि मादी दोन्हींचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे २४ लाख ७५ हजार रुपये खर्चाची निर्बिजीकरण करण्याच्या कामाची ई - निविदा काढली होती.
मात्र मुदतीत एकही निविदा भरली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी १६५० रुपये इतका दर निश्चीत केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून हा दर निश्चीत केला आहे. पण हा दर कमी असल्याच्या कारणांतून निविदाधारकांनी पाठ फिरवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्तास निविदेला दहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतीत तरी निविदा भरण्यात येणार काय, याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच दुधगंगा योजनेच्या कामाबाबत फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.