Wed, Feb 8, 2023

आजरा ः लम्पीने बैलाचा मृत्यू
आजरा ः लम्पीने बैलाचा मृत्यू
Published on : 30 December 2022, 4:12 am
सरंबळवाडीत लम्पीने बैलाचा मृत्यू
आजरा ः सरंबळवाडी (ता. आजरा) येथे बैलाचा लम्पीने मृत्यू झाला. अशोक सरंबळे यांच्या मालकीचा हा बैल आहे. पंधरा दिवसांपूर्वी या बैलाला लम्पीची लागण झाली होती. आजअखेर तालुक्यात ७७ जनावरे बाधित झाली आहेत. तालुक्यात १३ जनावरांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये बहिरेवाडी गावात ५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २६ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी गोठा स्वच्छ ठेवावा, गोठ्यात धूर फवारणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.