
दूध दहा मिली ॲक्युरसी
इलेक्ट्रॉनिक वजन काटे ॲक्युरसी
आदेशाला स्थगिती नको ः संभाजी ब्रिगेड
कोल्हापूर ः प्राथमिक दूध संस्थांमध्ये दुधाचे फॅट तपासण्यासाठी फक्त वीस मिलीलिटर दूध घ्यावे. गुणवत्ता तपासल्यानंतर शिल्लक दूध उत्पादकाला परत देण्याचे आदेश दुग्धविकास विभागाने दिले आहेत. मात्र, दूध उत्पादकाच्या फायद्याच्या या आदेशाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या आदेशाला स्थगिती देऊ नये, अशा आशयाचे पत्रक संभाजी ब्रिगेडने प्रसिद्धीस दिले आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे पाच-सहा वर्षांपासून दूध उत्पादकांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत सातत्याने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये आयुक्त वैद्यमापन शास्त्र विभागाने एक जानेवारी २०२३ पासून प्राथमिक दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे दहा मिली ॲक्युरसी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.