लव्ह जिहाद मोर्चा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लव्ह जिहाद मोर्चा रविवारी
लव्ह जिहाद मोर्चा रविवारी

लव्ह जिहाद मोर्चा रविवारी

sakal_logo
By

बिंदू चौकात ध्वजपूजन करून मोर्चाला प्रारंभ

उद्या जनआक्रोश मोर्चा : दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागाचे आवाहन

कोल्हापूर, ता. ३० : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गो-हत्या बंदीबाबत कडक कायदे करावेत, या मागणीसाठी रविवारी (ता. १) सकल हिंदू समाजातर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बिंदू चौकात ध्वजपूजन करून मोर्चाचा प्रारंभ होईल.
हा मोर्चा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे भवानी मंडपात जाईल. दरम्यान, मोर्चाचा समारोप भवानी मंडपात होणार होता; मात्र छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टने मोर्चाच्या समारोप सभेला परवानगी नाकारली. तीन डिसेंबर, २८ डिसेंबरला मोर्चाच्या परवानगीचे पत्र दिले होते; पण मोर्चाच्या दोन दिवस अगोदर ट्रस्टने परवानगी नाकारली. आम्ही ट्रस्टचा जाहीर निषेध करत आहोत. काही झाले तरी मोर्चा होणारच. भवानी मंडप कमानीच्या बाहेर मंडप घालण्यात येईल. मोर्चाची सांगता तिथे होईल, अशी माहिती महेश जाधव, संभाजी (बंडा) साळुंखे, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी, पराग फडणीस, उदय भोसले आदींनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व समाजाने मोर्चाच्यावेळी दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवून मोर्चात सहभाग घ्यावा, असे निवेदन विश्‍व हिंदू परिषदेतर्फे दिले. पत्रकार परिषदेला अॅड. सुधीर वंदूरकर, श्रीकांत पोतनीस, मधुकर नाझरे, राहुल कदम, सौरभ निकम, शांतीभाई लिंबानी, उत्तम सांडुगडे, अजित पाटील, सुरेश रोकडे, भवन पटेल आदी उपस्थित होते.
...

वाहतूक मार्गात बदल

सकल हिंदू समाजातर्फे उद्या (ता. ३१) होणाऱ्या मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल केला आहे. व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, १०० फुटी रस्ता खानविलकर पेट्रोल पंपाजवळ, शहाजी महाविद्यालय येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, भवानी मंडप असा निघणार आहे. मोर्चावेळी अंबाबाई मंदिर परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. मोर्चाचा मार्ग वगळून इतर रस्त्यावरून भाविक, पर्यटकांनी चालत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जावे, असे आवाहन वाहतूक नित्रंयण शाखाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.