लव्ह जिहाद मोर्चा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लव्ह जिहाद मोर्चा रविवारी
लव्ह जिहाद मोर्चा रविवारी

लव्ह जिहाद मोर्चा रविवारी

sakal_logo
By

बिंदू चौकात ध्वजपूजनाने होणार
जनआक्रोश मोर्चाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. ३० : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गो-हत्या बंदीबाबत कडक कायदे करावेत, या मागणीसाठी रविवारी (ता. १) सकल हिंदू समाजातर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बिंदू चौकात ध्वजपूजन करून मोर्चाचा प्रारंभ होईल.
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे मोर्चा भवानी मंडप कमानीबाहेर येईल व तेथे मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती महेश जाधव, संभाजी (बंडा) साळुंखे, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी, पराग फडणीस, उदय भोसले आदींनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व समाजाने मोर्चावेळी दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवून मोर्चात सहभाग घ्यावा, असे निवेदन विश्‍व हिंदू परिषदेतर्फे दिले. पत्रकार परिषदेला अॅड. सुधीर वंदूरकर, श्रीकांत पोतनीस, मधुकर नाझरे, राहुल कदम, सौरभ निकम, शांतीभाई लिंबानी, उत्तम सांडुगडे, अजित पाटील, सुरेश रोकडे, भवन पटेल आदी उपस्थित होते.
...
वाहतूक मार्गात बदल
जनआक्रोश मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल केला असून व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, १०० फुटी रस्ता खानविलकर पेट्रोल पंपाजवळ, शहाजी महाविद्यालय येथे वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे. मोर्चावेळी अंबाबाई मंदिर परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. मोर्चाचा मार्ग वगळून इतर रस्त्यावरून भाविक, पर्यटकांनी चालत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जावे, असे आवाहन वाहतूक नित्रंयण शाखाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.