रेल्वे प्रबंधक भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे प्रबंधक भेट
रेल्वे प्रबंधक भेट

रेल्वे प्रबंधक भेट

sakal_logo
By

कोल्हापूर रेल्वेस्थानकास
विभागीय प्रबंधकांची भेट

कोल्हापूर, ता. ३० ः रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचा भाग म्हणून अमृत योजनेतून कोल्हापूरच्या शाहू महाराज टर्मिनसवर चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे अश्वासन विभागीय मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक इंदुमती दुबे यांनी आज येथे दिले.
येथील शाहू महाराज टर्मिनसला श्रीमती दुबे यांनी भेट दिली. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्म विस्तारीकरण कामकाजाची त्यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी वरील आश्वासन दिले. श्रीमती दुबे या आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. येतानाच त्यांनी मिरज, कोल्हापूर तसेच हातकणंगले येथील रेल्वे स्थानक तसेच प्लॅटफॉर्मच्या सुविधांची पाहणी केली.
कोल्हापूर ते पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यानुसार दोन रेल्वे विद्युत इंजिनव्दाद्वारे रेल्वे धावत आहेत. लवकरच कोल्हापुरातील ३ व ४ प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. तेही तातडीने पूर्ण व्हावे, तसेच प्लॅटफॉर्म परिसर सुशोभीकरण, प्रवाशांची बोर्डिंग सुविधा सक्षम करण्याबरोबर गाड्यांच्या वेळापत्रकात प्रवासी सुलभ बदल करणे, या संदर्भात त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत वाणिज्य प्रबंधक डॉ. मिलिंद हिरवे व स्थानिक रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी उपस्थित होते.