क्रीडा वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा वृत्त
क्रीडा वृत्त

क्रीडा वृत्त

sakal_logo
By

भूमी पाटील प्रथम
कोल्हापूर, ता. ३१ : कोल्हापूर हायस्कूलमधील भूमी शिवाजी पाटील हिने शालेय सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तिने पाच किलोमीटर अंतर ९ मिनिटे ४६ सेकंदात पूर्ण केले. तिला मुख्याध्यापक व्ही. डी. हिरेमठ, क्रीडा विभाग प्रमुख व्ही. यू. माळकर, कपिल कोळी यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------
कोल्हापूर हायस्कूलचा
वार्षिक क्रीडा महोत्सव
कोल्हापूर, ता. ३१ : कोल्हापूर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच झाला. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर, स्कूल कमिटीचे चेअरमन आर. एम. जौंदाळ यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. सुरेखा कुरी हिने स्पर्धेच्या नियमावलीची शपथ घेतली. या वेळी रंगराव पाटील, मुख्याध्यापक पोवार, मुख्याध्यापिका सीमा पाटील, प्रा. एम. एस. पाटील, मुख्याध्यापक व्ही. डी. हिरेमठ उपस्थित होते.