गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

फोटो- L72341
...

‘गोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनीही जनावरे घ्यावीत

विश्‍वास पाटील ः दूध वाढ कृती कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना आवाहन

कोल्हापूर, ता. ३१ ः कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) वीस लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संघ विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. यामध्ये संघाच्या कर्मचाऱ्यांनीही जातिवंत दुभती जनावरे खरेदी करून योगदान द्यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केले.
''गोकुळ’च्या वतीने म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील संघाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले,‘सर्व कर्मचाऱ्यांनी संघाच्या म्‍हैस दूध वाढ कृती कार्यक्रमात सहभाग नोंदवून या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा बँक, अण्णासाहेब पाटील महामंडळ व गोकुळ कर्मचारी पतसंस्थेकडून जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजनेअंतर्गत सर्व संघ कर्मचाऱ्यांनी जनावरे खरेदी करून दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. या कार्यक्रमांतर्गत कर्मचारी वर्गासाठी दूध वाढीचा कृती आराखडा तयार केला असून, त्याची अंमलबजावणी काही तालुक्यांतून सुरू आहे. भविष्यात ती पूर्ण कार्यक्षमतेने राबविण्यात येणार आहे.’
स्‍वागत संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी केले. माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम यांची यावेळी भाषणे झाली. संचालक प्रकाश पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
यावेळी संचालक संभाजी पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,आस्‍थापना व्‍यवस्थापक डी.के.पाटील, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले आदी उपस्थित होते.
.............