चिकन, मटण, मासे, खेकड्यांची विक्रमी विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकन, मटण, मासे, खेकड्यांची विक्रमी विक्री
चिकन, मटण, मासे, खेकड्यांची विक्रमी विक्री

चिकन, मटण, मासे, खेकड्यांची विक्रमी विक्री

sakal_logo
By

फोटो : 72349
कोल्हापूर : मटण मार्केटमध्ये शनिवारी मटण, चिकन, मासे घेण्यासाठी अशी गर्दी दिसत होती.
....

मटण, चिकन, माशांवर खवय्यांचा ताव

३१ डिसेंबर जल्लोषात साजरा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आज मटण मार्केटमध्ये दिवसभर मटण, चिकन, समुद्री मासे, नदीचे मासे, खेकड्यांची मोठी विक्री झाली. सकाळी अन्‌ संध्याकाळी खवय्यांची गर्दी दिसत होती. अनेकांनी मटणाऐवजी चिकनला पसंती दिल्याचे दिसून आले.

आज दिवसभर शहरात ५० टन ब्रॉयलर पक्ष्यांची आवक झाली. विविध कंपन्यांमार्फत ब्रॉयलर पक्षी उपलब्ध होतात. यामध्ये सगुणा, बारामती ॲग्रो, जाफा, व्यंकिज्‌ चिकनचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात अंदाजे २५० ते ३०० चिकन सेंटर्स आहेत. या विविध चिकन सेंटरमध्ये २०० ते १७० रुपये किलोप्रमाणे चिकन विक्री सुरू होती. भाता काढून, स्किनसहित, स्किनविरहित प्रकारामुळे प्रत्येक सेंटरवरील दर वेगवेगळे होते.

कोल्हापूरमध्ये बकऱ्यांची मोठी आवक होते. ही आवक माडग्याळ, जत, साईखेड, घोडेगाव, बडोद (औरंगाबाद), अथणी, आटपाणी, चडचण, वडगाव मिरज भागातून होते. ३१ डिसेंबरच्या पाश्‍‍र्वभूमीवर शहरात अंदाजे ४०० बकऱ्यांची विक्री झाल्याची माहिती काही मटण विक्रेत्यांनी दिली. मटणाबरोबरच रक्ती मुंडीलाही अनेकांनी पसंती दिली.

...

चौकट

समुद्री-नदीतील माशांनाही मागणी
-विजयदुर्ग, मालवण, गोवा, देवगड, मुंबई, अलिबाग, सिंधुदुर्ग भागातून समुद्री माशांची आवक
-३१ डिसेंबरसाठी समुद्री माशांची अंदाजे १५ टन आवक
-हलवा, बांगडा, सुरमई, ताज्या झिंग्याला अधिक मागणी
-समुद्री माशांचे दरही स्थिर
-काळ्या पाठीच्या खेकड्यांनाही मागणी, २२० रुपयांना आठ ते नऊ नग
...

चौकट

मसाल्यांच्या पाकीटांची विक्री

मटण मार्केट परिसरात अनेकांनी खोबरे, मसाल्यांची पाकीटे विक्रीसाठी ठेवली होती. याबरोबरच तयार ओल्या मसाल्याची पाकिटेही उपलब्ध करुन दिली होती. हे मसाले घेण्यासाठी गर्दी होती. शहरात तयार मसाला सेंटरमध्येही दिवसभर गर्दी दिसत होती.