
सुरेश शिपूरकर पुरस्कार
72332
...
‘मनोबल’सारख्या संस्थांची समाजाला गरज
सुरेश शिपुरकर ः स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः सरकारला मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळत असला तरी समाजाचे मात्र नुकसान होते. या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीसाठी ‘मनोबल’सारख्या संस्थांची समाजाला गरज असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी व्यक्त केले.
देवाळे (ता. करवीर) येथील जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित मनोबल व्यसनमुक्ती केंद्राच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मनीष देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
मनोबल संस्थेअंतर्गत स्नेहसेतू पुरस्कार आणि आनंदयात्री अशा दोन नव्या उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. संस्थेचे रविदर्शन कुलकर्णी यांनी या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रास्ताविकात मनीष देसाई यांनी मनोबल संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. यावेळी संस्थेच्या ‘द केअर टेकर’ या नाटकासाठी राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार मिळवलेल्या दिग्दर्शक संजय हळदीकर आणि राजन जोशी यांचाही सत्कार झाला.
अविनाश शिरगावकर, डॉ. सुभाष आठल्ये यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते.