Thur, Feb 9, 2023

केडीसी बँक
केडीसी बँक
Published on : 31 December 2022, 3:59 am
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या
कर्जाची मुदत, वयाची अटही वाढवली
आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाचा कालावधी पाच वर्षांवरून सात वर्षे करण्याबरोबर वयोमर्यादा ५० वरून ६० करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी ज्या प्रवर्गासाठी कोणत्याही आर्थिक विकास महामंडळाची तरतूद नाही, अशा प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थपुरवठा करणार आहे. स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसायासाठी १५ लाख रुपये कर्ज मंजुरीची मर्यादा असून, साडेचार लाखापर्यंतच्या मर्यादेत व्याज परतावाही मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.