आता डिजिटल ई-रुपया येतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता डिजिटल ई-रुपया येतोय
आता डिजिटल ई-रुपया येतोय

आता डिजिटल ई-रुपया येतोय

sakal_logo
By

लोगो : बदलती करन्सी भाग - १

लिड
भविष्यात करन्सी (चलन) बदलाचा वेग गुणाकाराच्या पटीत वाढण्याची शक्यता आहे. त्याची सुरवात भारतासह जगातील काही देशांत झाली आहे. यापैकी भारतातील ‘ई-रुपया’ (डिजिटल करन्सी) हा क्रांती घडविण्याची शक्यता आहे. याच मुद्यांवर वृत्तमालिकेतून हा दृष्टिक्षेप...
--------------------

आता डिजिटल ई-रुपया येतोय
रोकडा होणार कमी; अर्थ व्यवहाराने बाजारात क्रांती
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : पावली, रुपयापासून प्लास्टिक मनी, एटीएम, पेटीएमपर्यंत करन्सीची (चलन) वापर पद्धती बदलत गेली. आता तर ई-रुपया येत आहे. डिजिटल करन्सीचा हा मोठा बदल यानिमित्ताने बाजारात येणार आहे. अर्थात त्याची सुरवात सध्या केवळ प्रायोगिक तत्त्वावर आहे. तरीही काही वर्षांतच त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात होईल. भविष्यातील व्यवहार हे केवळ डिजिटल होतील, अशी क्रांती ई-रुपया घडवेल, असाही विश्‍वास अभ्यासकांना आहे.
पूर्वी आणे, पावली, रुपया, पैसा अशा चलनातून व्यवहार होत होते. देवघेवसुद्धा याच आण्यातून होत होती. नंतर नोटा आल्या. एक रुपयांच्या नोटेपासून दोन हजार रुपयांपर्यंत नोटाचाही प्रवास पोहचला, व्यवहार वाढले. बॅंकिंग वाढले. तसे चलनाचे माध्यम बदलत गेले. बॅंकाच्या दारात गेल्याशिवाय पैशांची देवाण-घेवाण होणे तेव्हा खूपच अवघड होते, मात्र यातून बॅंकिंग बदलले. एटीएम, क्रेडिट कार्डच्या माध्‍यमातून प्लास्टिक मनीची एन्ट्री बाजारात झाली. पाहता पाहता त्याला ग्राहकांची पसंती मिळाली. सहज आणि सोप्या पद्धतीने बॅकिंग व्यवहार थेट बॅंकेत न जाता सुरू झाले.
बॅंकेची आणि ग्राहकांची संख्या पाहता यांचे गणित जुळविणे अशक्य होऊ लागले. परिणामी प्लास्टिक मनीला ऑनलाईन करन्सीची जोड मिळाली. यातून कोणत्याही ठिकाणी केवळ ‘क्युआर’ कोड स्कॅन करून पैशांची देवाण घेऊन सुरू झाली. बॅंकेतून ऑनलाईन होणारी उलाढाल वेगळीच राहिली. क्युआर कोडच्या माध्यमातून आता पाणीपुरीच्या गाड्यावर, भाजी विक्रेत्यांकडे, चहा टपरीवर, फाईव्हस्टार हॉटेलमध्येही व्यवहार सुरू झाले. ही क्रांती झाली मात्र या सर्वांमध्ये कोठे ना कोठे बॅंकेशी खाते, व्यक्ती जोडलेली राहिली. केवळ बॅंकेत न जाता सुलभ व्यवहार होऊ लागले. आता करन्सीची ही पद्धतसुद्धा मागे पडणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीकडे देशाने आपली वाटचाल सुरू केली आहे.
---------------
चौकट
देवाण-घेवाण ‘वॉलेट टू वॉलेट’
डिजिटल रुपयांमुळे सर्व व्यवहार पारदर्शक होणार आहेत. ज्या पद्धीतने ‘एटीएम’, ‘पेटीएम’ ग्राहक स्वतःहून शिकला त्याच पद्धतीने तो ई-रुपयाचे (डिजिटल) व्यवहारही शिकले. डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण केवळ वॉलेट टू वॉलेट होईल. ई-रुपया कधीच खराब होणार नाही. छपाई नाही, साठवणूक खर्च नाही. तो एकमेकांकडे फिरत राहील. त्यामुळे भविष्यात डिजिटल व्यवहाराला प्राधान्य मिळेल यात शंका नाही.