
तिघे वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
72374,72375, 72376
...
यादवनगरातील तिघे
वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः यादवनगरातील रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना आजपासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अश्विन अनिल शेळके (एमएसईबी रोड, गणेश मंदिरजवळ, यादवनगर), गौरव अनिल जानकर ( यादवनगर) आणि परेश अनिल कस्तुरे (गणेश मंदिरजवळ, यादवनगर) अशी त्यांची नावे असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.
या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याची दखल घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे आणि गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भगवान शिंदे यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर त्यांना एक वर्षाकरिता हद्दपार केले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या आदेशानुसार हा प्रस्ताव शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविला होता.