
भाजप तर्फे अजित पवार यांचा निषेध
72307
कोल्हापूर : अजित पवार यांचा निषेध करताना भाजपचे कार्यकर्ते.
भाजपतर्फे अजित पवार यांचा निषेध
कोल्हापूर : भाजपतर्फे आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निषेध केला. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे विधान केले होते. त्या निषेधार्थ आज भाजप कार्यकर्त्यांनी पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे छत्रपती शिवाजी चौकात दहन केले. पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, अजित ठाणेकर, हेमंत अराध्ये, महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाला भाजपा सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रताप देसाई, सुभाष रामुगडे, सुजाता पाटील, महादेव बिरंजे, सुनील वाडकर हे उपस्थित होते.