दीक्षांत समारंभाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीक्षांत समारंभाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
दीक्षांत समारंभाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

दीक्षांत समारंभाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

sakal_logo
By

पदवी प्रमाणपत्रासाठी
अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षान्त समारंभाकरिता पदवी प्रमाणपत्र मागणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांना ३५० रुपये शुल्काने अर्ज भरण्याकरिता २९ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र यासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज भरण्याकरिता ३५० रुपये शुल्कासह ५ जानेवारी आणि ८५० रुपये विलंब शुल्कासह १० जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांनी या विहीत कालावधीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.