
महर्षी शिंदे आवरण अनावरण कार्यक्रम
टपाल खात्याच्या महर्षी शिंदे
आवरण अनावरण समारंभ उद्या
कोल्हापूर ः महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त भारत सरकारच्या टपाल खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विशेष आवरण अनावरणाचा समारंभ सोमवारी (ता.२) होणार आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम होईल. टपाल खात्याचे गोवा रिजन पणजीचे प्रमुख पोस्ट मास्तर आर. के. जायभाये यांच्या हस्ते अनावरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शाहू महाराज, माजी कुलगुरू प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, तसेच प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित असतील. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली.