रंकाळा टॉवरजवळ तलवारी घेवून घरांवर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा टॉवरजवळ तलवारी घेवून घरांवर दगडफेक
रंकाळा टॉवरजवळ तलवारी घेवून घरांवर दगडफेक

रंकाळा टॉवरजवळ तलवारी घेवून घरांवर दगडफेक

sakal_logo
By

L17611
कोल्हापूर ः रंकाळा टॉवरजवळ सोमवारी रात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
ंरंकाळा टॉवरजवळ
तलवारी नाचवत
घरांवर दगडफेक
कोल्हापूर, ता. २५ ः रंकाळा टॉवर येथील श्रीराम बेकरीसमोर २५ ते ३० तरुणांच्या जमावाने नंग्या तलवारी नाचवत घरांवर, वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवली. या हल्ल्यात दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकाराने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
रंकाळा टॉवरकडून तरुणांचा जमाव हातात तलवारी घेऊन चाल करत आला. त्यांनी बेकरीशेजारील घरांना लक्ष्य करून दगडफेक करण्यास सुरुवात केली. हातात तलवारी असल्याने त्यांच्यासमोर जाण्याचे धाडस कुणाचे झाले नाही. त्या तरुणांनी बेकरीच्या दारातील दोन दुचाकींचे तलवारी, तसेच दगड मारत मोठे नुकसान केले. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर गस्त घालणारे पोलिस आले. त्यांनाही हा जमाव ऐकत नसल्याची स्थिती होती. सारा जमाव पानारी मळ्याकडून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गस्तीच्या पोलिसांनी आणखी कुमक मागवली. त्यावेळी काहींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर जमाव पळून गेला. जमाव पांगल्यानंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. हल्ला झालेल्या घरातील महिलांना घेऊन परिसरातील तरुणांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे गाठले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर विविध ठिकाणी गस्तीवर असणारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा प्रकार टॉवरजवळ लावण्यात येत असलेल्या खेळण्यांवरून तसेच पूर्वीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52531 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top