कोंडाळे गायब, कचरा रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडाळे गायब, कचरा रस्त्यावर
कोंडाळे गायब, कचरा रस्त्यावर

कोंडाळे गायब, कचरा रस्त्यावर

sakal_logo
By

17947

कोंडाळे निघाले, आता कचरा रस्त्यावर
उपनगरांत भेडसावतोय प्रश्‍न; टिपर वेळेत येत नसल्याच्या तक्रारी

कोल्हापूर, ता. २७ ः कोंडाळेमुक्त शहराची संकल्पना राबवत विविध ठिकाणचे कोंडाळे काढले जात आहेत. मात्र, अजूनही घराघरांतून कचरा उठाव होत नसल्याने परत कोंडाळ्यांच्या ठिकाणी कचरा फेकला जात आहे. त्याचा उठाव होत नसल्याने तो रस्त्यावर पसरत आहे. उपनगरात तसेच ग्रामीण हद्दीजवळ हा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
कोंडाळे बंद करून थेट घरातून कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेने टिपर घेतले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन टिपर दिले असून, दिवसभरात दोन शिफ्टमध्ये कचरा उठाव केला जात आहे. टप्प्याटप्प्याने कोंडाळे काढले जात आहेत. सध्या उपनगरांमधील कोंडाळे बंद केले जात आहेत. जवळपास पंधरा दिवसांत फुलेवाडी रिंगरोड, आर. के. नगर-मोरेवाडी रोड, कसबा बावडा ते शिये रोड, जरगनगर रोड, पाचगाव रोडवरील कोंडाळे काढले आहेत. त्याठिकाणी कचरा पडू नये असे अपेक्षित असताना कोंडाळ्याच्या ठिकाणी परत कचरा टाकला जात आहे. जरगनगर, पाचगाव रोड, हॉकी स्टेडियम रोड, आयसोलेशन हॉस्पिटल या परिसरातील कोंडाळ्याच्या ठिकाणी कचऱ्याचा ढिग पडत आहे. त्याचा उठावही केला जात नसल्याने भटक्या कुत्र्यांमुळे तो कचरा रस्त्यावर पसरत आहे. अनेक ठिकाणी नागरिक कामावर गेल्यानंतर टिपर येत असल्याने कचरा टाकता येत नाही. परिणामी तो कुठे तरी टाकावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

चौकट
ग्रामीण हद्दींवर मोठा प्रश्‍न
शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक महापालिकेच्या हद्दीत येऊन कचरा टाकत असल्याने शिये, फुलेवाडी रिंगरोड, आर. के. नगर, जरगनगर येथे कचरा रस्त्यावर दिसत आहे. शहरात रेसकोर्स परिसर, आयटीआय, निर्मिती कॉर्नर परिसर या ठिकाणीही कचरा रस्त्यावर दिसत आहे.

कोट
उपनगरांतील काही भागात आता कोंडाळे काढले असून, तेथील कचरा हळूहळू कमी होईल. शहराशेजारील ग्रामपंचायतींना कचरा उठावसाठी यंत्रणा राबवण्याबाबत सांगितले आहे.
-जयवंत पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक

ठळक चौकट
कचरा उठावची यंत्रणा
टिपर- १६९
प्रत्येक प्रभागात- २
शिफ्ट उठाव करण्यात येणाऱ्या शिफ्ट-२

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52854 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top