प्रशासकांना भाजप निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकांना भाजप निवेदन
प्रशासकांना भाजप निवेदन

प्रशासकांना भाजप निवेदन

sakal_logo
By

...अन्यथा दालनात बेमुदत ठिय्या
---
प्रशासकांना भाजपचा इशारा; कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाईची मागणी
कोल्हापूर, ता. २७ ः बायोमायनिंग प्रकल्पात होत असलेल्या घोटाळ्यातील दोषींवर तीन दिवसांत कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशासकांच्या दालनात सोमवार (ता. २५)पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा आज भाजपच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला.
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजपने जानेवारीत घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईबाबत सातत्याने पाठपुरावा केला. एक चौकशी समिती नेमली. त्या समितीचा अहवाल येऊन दोन महिने झाले, तरीही प्रमुख घोटाळेबाजांवर कारवाई केल्याचे निदर्शनास आलेले नाही. काही अधिकारी यात सहभागी असल्याने प्रशासन घोटाळेबाजांना पाठीशी घालून संरक्षण देत आहे. घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा निश्चिय भाजपने केला असून, तीन दिवसांत कारवाई न झाल्यास सोमवारपासून भाजपचे कार्यकर्ते दालनात येऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करतील. तसेच, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यास भाजप घोटाळ्याबाबत योग्य त्या न्यायालयात प्रशासनाविरोधात फौजदारी कारवाईसाठी दाद मागेल. शिष्टमंडळात चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर यांचा सहभाग होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52859 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top