महागाई विरोधात माकपची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाई विरोधात माकपची निदर्शने
महागाई विरोधात माकपची निदर्शने

महागाई विरोधात माकपची निदर्शने

sakal_logo
By

17835

महागाई विरोधात माकपची निदर्शने

इचलकरंजी, ता. २७ : चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव, अशा घोषणा देत वाढत्या महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने केली. देशात पेट्रोल, डिझेल सोबत खाद्यतेल अन्नधान्य यांचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप करीत आंदोलकांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या करामध्ये ५० टक्के कपात करावी, अशी मागणी केली. यावेळी काही काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवला होता.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस, खाद्यतेल, अन्न, धान्य भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर वेगाने वाढत आहेत. परिणामी सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र शासनावर आंदोलकांनी टीका केली.
पेट्रोल, गॅसच्या किंमती त्याच्या उत्पादन खर्चानुसार आकारून त्या प्रति सिलिंडर ५०० रुपये करावे, पेट्रोल, डिझेलच्या किंमत निर्धारणाचे आयात सममूल्य धोरण रद्द करावे, प्रत्यक्ष आयात व उत्पादन-वितरण खर्च या सूत्रानुसार पेट्रोल, डिझेलच्या किंमती आकाराव्यात, अशा मागण्या केल्या. आंदोलनात ए. बी. पाटील, सदा मलाबादे, शिवगोंडा खोत, दत्ता माने, नूरमहंमद बेळकुडे, दत्ता रावळ, सैफनबी शेख आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52870 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top