नांदवडेतील ३२ वृध्दांनी अनुभवला विमान प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदवडेतील ३२ वृध्दांनी अनुभवला विमान प्रवास
नांदवडेतील ३२ वृध्दांनी अनुभवला विमान प्रवास

नांदवडेतील ३२ वृध्दांनी अनुभवला विमान प्रवास

sakal_logo
By

नांदवडेतील ३२ वृध्दांनी अनुभवला विमान प्रवास
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : रापलेली त्वचा, कोणाचा लांब बाह्याचा नेहरु शर्ट, डोकीवर गांधी टोपी तर कोण हाप चड्डीमध्ये. कोण नऊवारी साडीत, तर कोण सहावारीमध्ये. त्यांची अंगकांती, मातकट कपडेच सांगत होते की ते खेडेगावातील कष्टकरी आहेत. एरवी श्रीमंतांच्या जगात त्यांच्याकडे दूर्लक्ष केले जाते. परंतु तिरुपती येथील विमानतळावर ते विमानात चढले आणि साध्या वर्तणुकीचतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैमानिक आणि हवाई सुंदरींनाही त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. नांदवडे (ता. चंदगड) येथील ६० ते ८० वयोगटातील ३२ जणांनी नुकताच तिरुपती ते बेळगाव विमान प्रवास केला. त्यातील अर्जून गावडे, तर दृष्टीहीन. विमान प्रवासाचे स्वप्न त्यांनी ७० व्या वर्षी पूर्ण केले.
शेती आणि प्रपंचामध्ये गुंतलेल्या अनेकांना कामाच्या व्यापातून वेळ काढावा. कुठेतरी निवांत फिरुन यावे म्हटले तरी शक्य होत नाही. १९५० ते ६० च्या दशकात जन्मलेल्या पिढीची ही अवस्था आहे. मात्र त्यांची दुसरी पिढी शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायात स्थिर झाली आहे. काहींची मुले परदेशात नोकरी करीत आहेत. त्यांना वाटते की आपल्या आई-वडिलांनी फिरावे. विशेषतः विमान प्रवास करावा. याच संकल्पनेतून त्यांनी अॅड. संतोष मळवीकर यांच्याशी संपर्क साधला आणि तिरुपती दर्शन सहलीचे नियोजन झाले. जाताना बेळगाव येथून रेल्वे आणि येताना विमान प्रवास केला. सहभागी बहुतांशजण प्रथमच रेल्वेने प्रवास करीत होते. रात्रीचा मुक्काम फाईव्हस्टार हॉटेलमध्ये होता. अनेकांनी हॉटेलच्या बाहेरच चप्पल काढून आत प्रवेश केला. हॉटेलमधील डामडौलही त्यांच्यासाठी नवीनच होता. स्विमींग टॅंकमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. अर्जून गावडे  दौलत कारखान्यातून अकौंटट म्हणून निवृत्त झाले. त्यांना दोन मुलीच. मुलींना उच्चशिक्षित करायचे आणि त्या नोकरीला लागल्या की विमान प्रवास करायचा असे त्यांचे स्वप्न होते. दोघीही मुली इंजिनिअर झाल्या. जावईही त्याच क्षेत्रातले. ते दोघेही परदेशात नोकरी करतात. दरम्यानच्या काळात त्यांची दृष्टी गेली. परंतु स्वप्न साकारायची जिद्द होती. मुलगी वर्षा केसरकर हिने त्यासाठी नियोजन केले. या सहलीमध्ये ती आई- वडिलांना घेऊन सहभागी झाली. गावडे यांनी स्पर्शानेच सर्वकाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विमानातून उतरताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52950 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top