
तक्रार निवारण कक्षाची कृषी विभागाकडून स्थापना
तक्रार निवारण कक्षाची
कृषी विभागाकडून स्थापना
गडहिंग्लज, ता. २७ : येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाने येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षातर्फे शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासह खते, बियाणे, कीटकनाशकांची उपलब्धता व त्यांच्या संनियंत्रणाचे काम चालणार आहे.
येत्या महिनाभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या खते आणि बियाणांबाबत विविध तक्रारी असतात. त्यांचे वेळेत निवारण होणे आवश्यक असते. त्यासाठी या कक्षाची स्थापना केली आहे. कृषी अधिकारी डी. पी. महाले गुण नियंत्रण निरीक्षक आहेत. त्यांच्यासह कृषी अधिकारी डी. ए. शेटे, विस्तार अधिकारी के. एस. गवई, विस्तार अधिकारी बी. बी. गोवंदे, विस्तार अधिकारी एस. एच. जज्जरवार, कृषी सहायक के. एस. धोंडगे या कक्षामध्ये कार्यरत असणार आहेत. शेतकऱ्यांना काही तक्रारी असतील, सूचना असतील तर त्यांनी या कक्षाशी (०२३२७२२२२३८) संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52968 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..