शिवशाही बसचा ब्रेक फेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाही बसचा ब्रेक फेल
शिवशाही बसचा ब्रेक फेल

शिवशाही बसचा ब्रेक फेल

sakal_logo
By

१७९३९
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी शिवशाही बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)


शिवशाही बसचा ब्रेक निकामी
सात वाहनांना ठोकरले; मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र सात वाहनांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः पुणे-कोल्हापूर-पणजी शिवशाही बस प्रवासी घेऊन मध्यवर्ती बसस्थानकातून पणजीकडे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जात होती. दाभोळकर कॉर्नरच्या दिशेने जात असताना बस प्रवासी घेण्यासाठी थांबली. त्याचवेळी अचानक बसचा ब्रेक निकामी झाला. तशी बस पाठीमागे जाऊ लागली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेली ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. तशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने ती बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पाठीमागील नागरिकांना बाजूला होण्याच्या सूचना करण्यास सुरवात केली. त्याचेवळी पाठीमागून एक स्कूलबस येत होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला असणाऱ्या चेंबर्सच्या दिशेने वळवली. ती येथील एका बंद असणाऱ्या गाळ्यावर नेऊन थांबवली; मात्र या अपघातात चार मोटारसायकल आणि एका मोटारीचे मोठे नुकसान झाले. अन्य दोन मोटारसायकललाही धडक बसली. अपघाताची माहिती परिसरात पसरली. तशी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

चालकाच्या सतर्कतेने टळला अनर्थ
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहनांसह प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजही तीच परिस्थिती होती. याच ठिकाणी बसचा ब्रेक फेल झाला; पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाचे परिसरात कौतुक होत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52996 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top