पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

गांधीनगरातील दोन दुकानांतून
बनावट चप्पलचा साठा हस्तगत
उजळाईवाडी ः गांधीनगर बाजारपेठेतील लक्ष्मी फुटवेअर व अर्बुद फुटवेअरवर स्वामित्व कायद्याचा भंग केल्याबद्दल कारवाई केली. लक्ष्मी फुटवेअरचे चालक बलराम गोकराम प्रजापत, नथाराम गोकाराम प्रजापत (दोघेही गांधीनगर) व अर्बुद फुटवेअरचे चालक भीमाराम देशाराम प्रजापत (चिंचवाड रोड, गांधीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दोन्ही दुकानातून एक लाख ६१ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांनी बनावट चप्पलचा साठा विक्रीसाठी ठेवला होता. पॅरेगॉन कंपनीच्या वतीने निखिल दिनकर पाटील (उचगाव) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. लक्ष्मी फुटवेअरमध्ये बलराम व नथाराम या बंधूंकडे ४६ हजार १६८ रुपयांचा व अर्बुद फुटवेअरमध्ये भीमाराम प्रजापत यांच्याकडे एक लाख १५ हजार २२ रुपयांचा बनावट चप्पलचा साठा विक्रीस ठेवला होता. तो जप्त केला असून गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

आजरा साखर कारखान्यातून मोटार चोरीस
आजरा ः आजरा साखर कारखान्यातून मोटर चोरीस गेली. याची किंमत अकरा हजार रुपये आहे. याबाबत आजरा पोलिसांत गुन्हा नोंद केला. कारखान्याचे प्रभारी सुरक्षा अधिकारी जगदीश तात्यासो देसाई यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार संतोष घस्ती तपास करीत आहेत. कारखाना बंद काळात सुमारे सात लाख रुपयांच्या बेरिंग्जची चोरी झाली होती. वर्षभरापूर्वी याबाबतची तक्रार दाखल केली होती. याबाबतचा तपास सुरु आहे. हे प्रकरण ताजे असतांना दरम्यान मोटारीची चोरी झाल्याने सभासदांच्यात खळबळ उडाली आहे.

सरूड येथील जवान बेपत्ता
कोल्हापूर ः सरूड (ता. शाहूवाडी) येथील तरुण बेपत्ता झाला. अमर मारुती कदम (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. ते ३ मार्च रोजी बांबवडे येथे जावून येथे असे सांगून निघून गेले आहेत. ते केंद्रीय राखीव बल येथे जी.डी. पदावर छत्तीसगड येथे नोकरीस आहेत. याबाबत माहिती मिळाल्यास संबधितांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस नाईक यु. एस. भुरुंगडे यांनी केले आहे.

चोरीप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी
जयसिंगपूर : मोटारसायकल चोरी प्रकरणी वैभव रामचंद्र बोडके, रोहित विलास पोतदार (दोघे आपटेनगर, कोल्हापूर) व संदीप बाळासाहेब पोतदार (शिरदवाड, ता. शिरोळ) यांना ताब्यात घेऊन सहा मोटारसायकली ताब्यात घेतल्या होत्या. तिघांना बुधवारी (ता.२७) येथील प्रथमवर्ग न्यायालायसमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

पोळगावात युवतीची आत्महत्या
आजरा ः पोळगाव (ता. आजरा) येथील सविता नारायण खामकर (वय १७) या युवतीने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. २६) घडली. नारायण विष्णू खामकर यांनी आजरा पोलिसात वर्दी दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास आजरा पोलिस करीत आहेत.

महिलेवर अत्याचार
कोल्हापूर ः दिलेल्या पैशाचे व्याज कमी करून देतो, घर आणि पैसे परत देतो असे सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत एकावर गुन्हा दाखल केला. बाळासाहेब चोपदार असे त्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार २०१६ मध्ये घडल्याची फिर्याद पीडित महिलेने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53037 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top