बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन
बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन

sakal_logo
By

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन
इचलकरंजी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदी, नूतनीकरण कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. यासाठी मंडळाकडून किंवा शासनाकडून कोणत्याही मध्यस्थ, संघटना यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे कामगारांनी कोणत्याही खासगी व्यक्तीकडे नोंदणी, नूतनीकरणासाठी न जाता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून ३० भांड्यांचा संच देण्यात येणार असल्याचे सांगून काही एजंट पैसे गोळा करीत असल्याच्या तक्रारी कार्यलयाकडे येत आहेत. अशी कोणतीही योजना महामंडळाकडून कार्यान्वित नाही. बांधकाम कामगारांना काही शंका असल्यास त्यांनी कार्यालयाच्या फोनवर अथवा प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आयुक्त गुरव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53047 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top