
आयडॉल वितरण
लोगो घेणे
‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’चे उद्या वितरण
‘सकाळ’चे आयोजन ः ‘हेल्थ केअर अँड वेलनस’ पुरस्काराने गौरव
कोल्हापूर, ता. २७ ः कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंतांना शुक्रवारी (ता. २९) होणाऱ्या ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘हेल्थ केअर अँड वेलनेस’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता हॉटेल सयाजी येथे कार्यक्रम होईल. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आरोग्य संचालक व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.
महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक कर्तृत्त्ववान व्यक्तींनी जन्म घेतला. त्यांची मूल्ये, कष्ट व सामाजिक बांधिलकी याचा जनतेने कायमच सन्मान केला आहे. अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या, समाजाला दिशा दाखवणाऱ्या अशा गुणवंतांचा गौरव करण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत गौरवण्यात येणार आहे.
शुक्रवारी (ता. २९) कार्यक्रमात जिल्ह्यातील कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या ३२ डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या संस्थांना ‘हेल्थ केअर अँड वेलनेस’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरस्कारप्राप्त व्यक्तींना ‘सकाळ’ माध्यमांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
कोल्हापुरातील डॉ. चंद्रशेखर पाटील, डायमंड हॉस्पिटल, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, डॉ. संदीप इंचनाळकर, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. अतुल जोगळेकर, डॉ. श्वेता पत्की-कुलकर्णी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. युवराज पोवार, अथायु हॉस्पिटल, शिल्पा हुजुरबाजार, ग्रेस स्कीन कॉस्मेटिक अँड डेंटल केअर, डॉ. राजेंद्र पाटील, विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय, डॉ. विजय बांगर, डॉ. शेखर भिसे, डॉ. तुषार भोसले, डॉ. प्राची घुणके, अजिंक्य पाटील, डॉ. वैभव चव्हाण, डॉ. पल्लवी मुग, डॉ. तुषार बलूगडे, डॉ. अरुण परितेकर, डॉ. योगेश खवरे, माउली केअर सेंटर, डॉ. सचिन झाडबुके, कविता खडतारे-साळे, अर्पण ब्लड बँक, दाजीबा पाटील, डॉ. दत्तात्रय कदम, डॉ. पुंडलिक पोवाळकर, राजर्षी शाहू ब्लड सेंटर यांना गौरवण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53105 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..