
पुढील खर्चाचे नियोजन टप्प्याने करा
जिल्हा परिषदेतून...
पुढील खर्चाचे नियोजन टप्प्याने करा
प्रशासक संजयसिंह चव्हाण; स्थायी समिती सभेत प्रस्ताव देण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : आर्थिक वर्ष संपत असताना कोट्यवधीची बिले सादर केली. आठ दिवसात प्रशासकीय मान्यता आणि तात्काळ कामांची देयके सादर करणे योग्य नाही. दरवर्षी ३१ मार्चलाच बिले सादर करणे हे पुढील काळात चालणार नाही. त्यामुळे खातेप्रमुखांनी दर महिन्याला ठराविक रकमचे कामे पूर्ण करावीत, याबाबत मुख्य वित्त व लेखाधिकारी यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिले. यावेळी विविध विभागांनी विकासकामांचे, योजनांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा परिषदेत स्थायी समिती सभेचे आयोजन केले होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनिषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख तसेच गट विकास अधिकारी ऑनलाईनदवारे या सभेस उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचा मार्च अखेर ३१ मार्चला रात्री १२ वाजता झाला. ३० व ३१ मार्च या दोन दिवसात जवळपास दीड हजारपेक्षा अधिक बिले सादर झाली. बांधकाम विभागाकडून सर्वाधिक बिले दिली. या बिलांवर वित्त विभागाने अनेक त्रुटी लावल्या. मात्र या त्रुटींची पूर्तताही झाली नाही. वित्त विभागाने अनेक कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. एकाच दिवशी कामाचे आदेश आणि बिलेही सादर होण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी तर काम न होताच बिले सादर करण्यात आली. या सर्व प्रकाराची गंभीर दखल प्रशासक चव्हाण यांनी घेतली. वर्षभर कामांना मुदत असताना दरवर्षी ३१ मार्चरोची बिले येत असल्याबददल त्यांनी अधिकारांकडे विचारणा केली. अशी परिस्थिती पुढील वर्षी येवू नये यासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. दर महिन्याला १० ते २० टक्के खर्च करणे, कामांची प्रगती साधणे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53135 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..