
आजरा ः गजरगाव संरक्षक कठडेची मागणी
18126
गजरगाव (ता. आजरा) ः येथील हिरण्यकेशी नदीवरील अरुंद असलेला गजरगाव बंधारा
गजरगाव बंधारा वाहतुकीला धोकादायक
संरक्षक कठड्याची गरज : अपघाताच्या घटनांत वाढ
सुभाष पोवार : सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. ७ : हिरण्यकेशी नदीवरील गजरगाव बंधारा वाहातुकीला धोकादायक ठरत आहे. बंधारा अरुंद असल्याने वाहानधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दीड महिन्यात बंधाऱ्यावरून दुचाकी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. तर एक युवक दुचाकीसह पाण्यात पडल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला. बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने बंधाऱ्यावरील प्रवास धोक्याचा बनला असून अपघातात वाढ झाली आहे. गजरगाव व हारुर या गावाला जोडणारा हा बंधारा आहे. ४० वर्षे या बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू आहे. गजरगाव येथील लकमेश्वर प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ आहे. त्याच बरोबर महागाव हे गाव जवळ असल्याने बाजारपेठेसाठी गजरगावासह इंचनाळ, बेळगुंदी, हारुर, निंगुडगे, कोवाडे, ऐनापूर, सरोळी, अत्याळ ही गावे या मार्गाचा महागावला जाण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर करतात. त्यामुळेही बंधाऱ्यावरून दुचाकी व चार चाकी या छोट्या वाहनांची
ये- जा असते. हा बंधारा अरूंद आहेच त्याचबरोबर त्याला संरक्षक कठडे नाहीत. पावसाळ्यात बंधारा पाण्याखाली गेल्यावर जीव धोक्यात घालून नागरिकांची ये- जा असते. बंधाऱ्याला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोट
गजरगाव बंधारा हा अरुंद आहे. बंधाऱ्यावर संरक्षक कठडे नाहीत. गजरगावातील लकमेश्वर हे देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मार्गावर भाविकांची गर्दी असते. येथे वारंवार अपघात होतात. येथे संरक्षक कठडे उभा करावेत. पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
-शाम गुरव, सामाजिक कार्यकर्ते
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53323 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..