
कोटितीर्थ जलपर्णी
सकाळ इम्पॅक्ट
18154
कोटितीर्थ तलावातील
जलपर्णी काढण्याचे काम सुरू
कोल्हापूर, ता. २८ : राजारामपुरी येथील कोटितीर्थ तलावातील जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. महिन्यात तलाव जलपर्णीमुक्त करण्यात येणार आहे.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेवरून विभागीय कार्यालय तीन, पर्यावरण, आरोग्य व अग्निशमन विभागाच्यावतीने जलपर्णी काढण्यात येत आहे. बुधवारपासून कर्मचाऱ्यांच्या व बोटीच्या सहाय्याने ते करण्यात येत होते. गुरुवारपासून जेसीबीद्वारे जलपर्णी काढण्यात येत आहे. कोटितीर्थ तलाव संवर्धनासाठी पंधराव्या वित्त आयोगातून दोन कोटी ४९ लाखांची निविदा प्रसिद्ध केली असून, ती मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यातून तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून गाळ काढणे, पिचिंग करणे, कारंजा बसवणे व इतर कामांचा समावेश आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तलावाचे पुनरुज्जीवीकरण होणार आहे.
चौकट
‘सकाळ’ने आवाज उठवला
कोटितीर्थ तलाव जलपर्णीने व्यापल्याची बातमी सोमवारच्या (ता. २५) अंकात सचित्र प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे मांडले होते. त्यानंतर तीनच दिवसात महापालिकेने जलपर्णी काढण्याची तयारी करून कामाला सुरूवात केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53332 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..