संभाजी ब्रिगेडने उचलली मेन राजारामची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी ब्रिगेडने उचलली मेन राजारामची जबाबदारी
संभाजी ब्रिगेडने उचलली मेन राजारामची जबाबदारी

संभाजी ब्रिगेडने उचलली मेन राजारामची जबाबदारी

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद
-

१८१९०

संभाजी ब्रिगेडने उचलली
मेन राजारामची जबाबदारी

पटसंख्या वाढवण्यासाठी कसली कंबर

कोल्‍हापूर, ता. २८ : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व एकेकाळी प्रवेशासाठी आमदार, खासदार मंत्र्यांचीही शिफारस असणाऱ्या जिल्‍हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्‍कूलला घरघर लागली आहे. निकालाची उज्‍ज्वल परंपरा असणाऱ्या या शाळेची गेल्या काही वर्षात मोठी अधोगती झाली आहे. वशिल्यावर येणारे शिक्षक व प्राथमिक शिक्षण विभागाचे दुर्लक्ष यामुळे ही शाळा बंद पडते की काय, अशीच परिस्‍थिती आहे. या शाळेवर व येथील जागेवरही अनेकांचा डोळा आहे. मात्र, ही शाळा पडद्याआड जाऊ नये म्‍हणून संभाजी ब्रिगेड सरसावली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी शाळेच्या गुणवत्तेची, ऐतिहासिक पार्श्‍वभूमीची प्रचार ‍प्रसिद्धी केली जाणार आहे. या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमही या वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी घेतला आहे.
भवानी मंडपात १५ फेब्रुवारी १८७० मध्ये मेन राजाराम शाळेची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. शाळेला १५० वर्षांची परंपरा आहे. २००० पर्यंत शाळा चांगल्या स्‍थितीत होती. २००५ पर्यंत येथे प्रवेशासाठी आमदार, खासदारच काय पण मंत्र्यांकडूनही शिफारस होत होती. मात्र प्रवेशातील वशिलेबाजी आणि शिक्षकांमधील गटबाजीमुळे शाळेची गुणवत्ता ढासळत गेली. आता तर पाचवी ते सातवीचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ ज्युनिअर कॉलेजमुळेच ही शाळा सुरू आहे. या शाळेत गोपाळ कृष्‍ण गोखले, बाळासाहेब देसाई यांच्यापासून ते यशवंतराव चव्‍हाणांपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षण घेतले आहे.
ही शाळा बंद पडू नये म्‍हणून संभाजी ब्रिगडेचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. ६ ते १४ मे या काळात शहरात विविध उपक्रम घेऊन मेन राजाराम शाळेबाबत जागृती केली जाणार आहे.

कोट
ही ऐतिहासिक शाळा आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या स्‍मृतीशताब्‍दी वर्षाचे औचित्य साधून मेन राजाराम हायस्‍कूलचा शैक्षणिक जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेत सेमी इंग्रजी माध्यम सुरु करत आहोत. शाळेतील शिक्षक जिल्‍ह्यातील नामवंत शिक्षक असतील. त्यांची निवड शैक्षणिक अत्युच्‍च कामगिरीवर होईल. भौतिक सुविधेतह शाळा कमी पडणार नाही. मेन राजारामला गतवैभव आण्यासाठी आवश्यक ते सर्व जिल्‍हा परिषदेकडून केले जाईल.
-संजयसिंह चव्‍हाण,
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53351 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top