
शिरोळला आजपासून पारायण
शिरोळला आजपासून पारायण
शिरोळ ः येथील राजर्षी शाहू कुमार विद्या मंदिरच्या प्रांगणात अखंड हरिनाम व पारायण सोहळा २९ एप्रिल ते ५ मेपर्यंत होणार असल्याची माहिती नीळकंठ उर्फ पिंटु फल्ले यांनी दिली. कोरोनामुळे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा आयोजीजित केला नव्हता. प्रत्येक दिवशी सकाळी सव्वा सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पठण, महिला भजनी मंडळाचे कीर्तन, प्रवचन, पहाटेची काकड आरती, हरीजागर केला जाणार आहे.
प्रवचनासाठी विक्रम बनकर, भागवत शिंदे, दत्तात्रय आंबी, सोपान बंडगर, रावसो कणेरे, ऋषिकेश वास्कर, भीमराव खटावे, एकनाथ आप्पा वास्कर महाराज आदी उपस्थित राहणार आहेत. सागर चव्हाण, प्रभुराज वास्कर महाराज, भिकाजी शिंदे, गोपाळ आण्णा वास्कर महाराज, विठ्ठलदादा वास्कर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. पारायणासाठी उपस्थित असलेल्या भक्तांना चहा, नाष्टा, दुपारचे जेवण तसेच शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53400 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..