''त्रिपुरेश्वर''च्या सभापतीपदी श्री. धोंडीराम आगम : उपसभापतीपदी सौ. राजश्री चौगले बिनविरोध. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''त्रिपुरेश्वर''च्या सभापतीपदी श्री. धोंडीराम आगम : उपसभापतीपदी सौ. राजश्री चौगले बिनविरोध.
''त्रिपुरेश्वर''च्या सभापतीपदी श्री. धोंडीराम आगम : उपसभापतीपदी सौ. राजश्री चौगले बिनविरोध.

''त्रिपुरेश्वर''च्या सभापतीपदी श्री. धोंडीराम आगम : उपसभापतीपदी सौ. राजश्री चौगले बिनविरोध.

sakal_logo
By

1187

वडणगेतील रहिवासासाठी विकसित प्लॉट
ग्रामपंचायतीच्या नावे करण्याची मागणी
वडणगे ः रहिवासासाठी विकसित केलेल्या क्षेत्रातील खुले प्लॉट ग्रामपंचायतीच्या नावे करावेत, अशी मागणी सरपंच सचिन चौगले यांनी केली आहे. याबाबत करवीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या परवानगीने रहिवासासाठी विकसित केलेल्या क्षेत्रातील खुल्या प्लॉटवर अतिक्रमण होऊ नये तसेच त्याचा विकास करण्यासाठी ते प्लॉट ग्रामपंचायतच्या नावे करावेत. वडणगेत असे ५३ गुंठे क्षेत्र खुले आहे; पण ते अजून ग्रामपंचायतीच्या नावावर नाही. नावावर झाल्यास त्याची देखभाल होईल, विकास करणे सोईचे होईल आणि अतिक्रमण होणार नाही. हा त्यामागील उद्देश आहे. उपविभागीय अधिकारी नावडकर यांनी प्लॉट लवकरच ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचा आदेश करू, अशी ग्वाही दिली. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

३५५५
धोंडिराम आगम अध्यक्षपदी
कोनवडे ः पाचवडे (ता. भुदरगड) येथील त्रिपुरेश्वर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धोंडिराम रखमाजी आगम यांची तर उपाध्यक्षपदी राजश्री बाळासो चौगले यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक एस. एस. पाटील होते. सरपंच उदय देसाई प्रमुख उपस्थित होते. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. सदस्य असे : तात्यासो खोपडे, रामचंद्र चौगले, शामराव भांदिगरे, भास्कर देसाई, सर्जेराव खोपडे, राजाराम फराकटे, अशोक देसाई, एकनाथ मगर, महादेव तिळवे, सुनंदा खोपडे आदींसह सरपंच उदय देसाई, आनंदराव देसाई, भरत देसाई, बंडेराव आगम उपस्थित होते.

३५५३
कूर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोनवडे ः कूर (ता. भुदरगड) येथे उपसरपंच रणजीत हिंदुराव पाटील यांच्यातर्फे रक्तदान शिबिर झाले. वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेने संकलन केले. ७० जणांनी रक्तदान केले. उदघाटन जि. प. सदस्य जीवन पाटील, युवा नेते राहुल देसाई, सरपंच दत्तात्रय हळदकर, पं. स. उपसभापती अजित देसाई, संजय सरदेसाई यांचे हस्ते झाले. रणजित पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप झाले. शिवराज देसाई, अनिकेत देसाई, प्रकाश पाटील, संग्राम सावंत, शिक्षक नेते दादा लाड, प्रा. हिंदुराव पाटील, वसंत प्रभावळे, आनिल हळदकर, संदीप पाटील, सुरेंद्र धोंगडे, आनंदा खाडे, संदीप पाटील, उत्तम चोडणकर, विक्रम हळदकर, सुनील भारमल, नेताजी पाटील, अनिकेत मिसाळ, दिग्विजय देसाई आदी उपस्थित होते.

02686
0268५
श्री भवानी सेवा संस्थेचे पातले अध्यक्ष
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील श्री भवानी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान विराप्पा पातले तर उपाध्यक्षपदी रघुनाथ धोंडिबा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. एस.भोई होते. निवडीवेळी नामदेव रेवडेकर, भिकाजी सापळे, ज्योतीराम सुतार, अशोक चौगले, बळवंत एरुडकर, तानाजी पातले, भारती पातले, अंजना पातले, संजय कांबळे ,गणपती सापळे, सचिव मारूती पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. स्वप्नील पातले यांनी स्वागत केले.

पैजारवाडी सेवा संस्था कोरे गटाकडे
देवाळे ः पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथील विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे गटाच्या शेतकरी पॅनेलने १२ पैकी १० जागा जिंकत सत्ता कायम राखली. विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. दोन्ही गटातील जागा वाटपात एकमत न झाल्याने निवडणूक लागली होती. विजयी उमेदवार असे ः शिवराम आबा गराडे, दिलीप विठ्ठल गराडे, भीमराव ईश्वरा चिले, सचिन वसंतराव चिले, विलास बाबूराव जाधव, कृष्णा रामचंद्र यादव, महादेव गणपती यादव, धनाजी आबाजी चिले, रघुनाथ हिरवे, पार्वती बापू घोसाळकर, सुशीला चिले, अशोक साठे. ओबीसी गटातील अर्ज छाननीत बाद झाल्याने ही जागा रिक्त राहिली.

कोडोलीत रविवारी मारुती मंदिराचे लोकार्पण
कोडोली ः येथील मारुती मंदिराचे जीर्णोद्धार पूर्ण करून मंदिराचे अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर मंदिराचे वास्तुशांती व लोकार्पण सोहळा होणार रविवारपासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक प्रदीप यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ सचिव डॉज. यंत पाटील यांनी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचे काम पूर्ण झाले असून वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवार (ता. १) पासून सलग तीन दिवास विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.


01183
प्रा. संजय कुरणे यांना पुरस्कार प्रदान
अब्दुललाट : येथील संजय कुरणे यांना सोनवणे फाउंडेशन (नाशिक) यांचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी दिल्ली येथे विधीज्ञ अॅड. मेहमूद पाशा यांच्या उपस्थितीत झाला. कुरणे यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यासाठी पुरस्कार प्रदान केला. इचलकरंजी येथील नालंदा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्फत गरजू व होतकरू मुलांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ते करतात. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडला होता यासाठी महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्यावतीने निर्माण केलेल्या ब्रिज कोर्ससाठी त्यांनी योगदान दिले आहे.

1596
मयुरी कांबळेला ‘मोस्ट टॅलेंटेड’ ॲवॉर्ड
कसबा तारळे ः गुडाळ (ता. राधानगरी) येथील मयुरी भिमराव कांबळे हिला ''नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवार्ड'' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वत्कृत्व कलेत तीने केलेल्या कामाची दखल घेत पुणे येथील नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ संस्थेमार्फत प्रमाणपत्र व सुवर्णपदक देवून तीचा गौरव करण्यात आला. एवढ्या कमी कालावधीत तीला मिळालेला हा १०७ वा पुरस्कार असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. मयुरी ही सरवडे येथील श्री शिवाजीराव खोराटे विद्यालयाची विद्यार्थिनी असून तीला शिक्षक व कुटुंबीयांचे मार्गदर्शन लाभले.


दत्त सेवा संस्था बिनविरोध
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील दत्त विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत ४६९सभासद पात्र होते. या संस्थेचे नेतृत्व संचालक एकनाथ पाटील यांच्यासह आबाजी पाटील, अनिल पाटील ,युवराज पाटील, रंगराव पाटील करत आहेत.
संस्थेच्या स्थापनेपासून सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध निवड झालेले संचालक- कर्जदार गट: एकनाथ राजाराम पाटील, आनंदा लहू पाटील, यशवंत हरी रानमाळे, बळवंत शंकर पाटील, हिंदुराव बळवंत रेपे, शिवाजी शंकर पाटील, विठ्ठल रामचंद्र पाटील, दिनकर शामराव पाटील .अनुसूचित गट- बळवंत दत्तात्रय कांबळे, इतर मागासवर्गीय गट- गणपती हरी परीट. महिला गट -सखुबाई पांडुरंग पाटील, शोभा किसन खाडे .भटक्या विमुक्त गटातील जागा रिक्त राहिली .निवडणूक अधिकारी म्हणून राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसूफ शेख यांनी काम पाहिले व सागर रानमाळे यांनी सहकार्य केले. धोंडीराम लक्ष्मण पाटील व महादेव नाना पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेचे सचिव दिनकर कुराडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53432 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top