
गारगोटी : आवश्यक कार्यक्रम
02272
प्रा. बाळ देसाईंचा आज
गारगोटीत अमृतमहोत्सव
गौरव अंकाचेही होणार प्रकाशन
गारगोटी, ता. २८ : भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष, मौनी विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. बाळ देसाई यांचा अमृतमहोत्सव समारंभ उद्या (ता. २९) होत आहे. इंजूबाई देवालयाशेजारील प्रांगणात सकाळी दहा वाजता कार्यक्रम होईल. डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी असतील. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार बजरंग देसाई, के. पी. पाटील, दिनकरराव जाधव, शिवरामराजे खेमसावंत प्रमुख उपस्थित असतील.
प्रा. बाळ देसाई भुदरगड तालुक्यातील डाव्या व पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असून सध्या भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. मौनी विद्यापीठाचे संचालक व जिल्हा सहकारी बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून गारगोटीचे सरपंचपद देखील त्यांनी भूषवले आहे. सुसंस्कृत व्यक्ती म्हणून प्रा. देसाई परिचित आहेत. तालुक्यातील मित्रमंडळ व जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार उद्या सकाळी दहा वाजता इंजुबाई देवालयाच्या शेजारील प्रांगणात होणार आहे.
प्रा. देसाई यांच्या गौरव अंकाचे प्रकाशन होणार आहे. ही माहिती गौरव समितीच्या वतीने मधुकर देसाई, डॉ. राजन गवस, व्ही. जे. कदम, नंदकुमार मोरे, अंकुशराव चव्हाण, बी. ए. सदलगे, सम्राट मोरे, प्रा. उदय शिंदे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53586 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..