राजन गवस व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजन गवस व्याख्यान
राजन गवस व्याख्यान

राजन गवस व्याख्यान

sakal_logo
By

18330
चंदगड ः प्राचार्य आर. आय. पाटील यांचा सत्कार करताना डॉ. राजन गवस. शेजारी अॅड. एस. आर. पाटील, ज. गा. पाटील, भरमूअण्णा पाटील, कल्पना पाटील, गोपाळराव पाटील.

खेड्यातल्या शाळा बंद पडल्यास
मुलींच्या शिक्षणावर परिणाम
डॉ. राजन गवस; आर. आय. पाटील यांचा निवृत्तीपर सत्कार
चंदगड, ता. ३ ः खेड्यातील शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव सुरू असून त्याचा फटका दूर्गम, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याचा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस त्यांनी दिला. येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील यांच्या निवृत्ती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अॅड. एस. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मांडला. शिक्षणाने समाज सुधारतो की बिघडतो असा प्रश्न करुन या क्षेत्रातील धुरीणांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. त्याचाच आधार घेत डॉ. गवस यांनी या क्षेत्रातील वाईट गोष्टीवर बोट ठेवले. प्राचार्य पाटील यांच्या कार्यपध्दतीबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. सत्काराबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार पाटील, गोपाळराव पाटील, प्रा. जयवंत पाटील, प्रा. दीपक पाटील, टी. एस. गडकरी, नितीन पाटील, भोसले, के. ए. पवार, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, अॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील यांची भाषणे झाली. या वेळी नगराध्यक्षा प्राची काणेकर, सचिन बल्लाळ, प्रा. आर. पी. पाटील, एल. डी. कांबळे, ज. गा. पाटील, शांताराम पाटील, विलास पाटील, विक्रांत बांदिवडेकर उपस्थित होते. प्रा. मनिषा आमणगी यांनी प्रास्ताविक केले. एम. व्ही. कानूरकर यांनी परिचय करुन दिला. श्रध्दा कानूरकर यांनी मानपत्राचे वाचन केले. बी. आर. चिगरे यांनी आभार मानले. संजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53719 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top