एज्युकेशन संबंधित पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशन संबंधित पत्रके
एज्युकेशन संबंधित पत्रके

एज्युकेशन संबंधित पत्रके

sakal_logo
By

18359
कोल्हापूर : ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

‘गोखले’च्या कॅम्पसमधून
२३० विद्यार्थ्यांची निवड
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, इन्फोसिस बीपीएन बंगळूरतर्फे आयोजित ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षात (बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स, बीबीए, बीसीए) शिकणाऱ्या २३० विद्यार्थ्यांची इन्फोसिस पुणे येथे निवड झाली. ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या इंटरव्ह्यू प्रोग्रॅममध्ये लेखी परीक्षा, कौशल्यावर आधारित मुलाखतीच्या दोन फेऱ्या झाल्या. यातून २३० विद्यार्थ्यांची निवड झाली. यात कोल्हापूर, बीड, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील ५० महाविद्यलयांतील १७५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशासन अधिकारी डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे, प्रा. पी. बी. झावरे, प्लेसमेंट सेलचे चेअरमन प्रा. सुहास घाटगे, प्रा. डॉ. डी. व्ही.आवळे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी प्रा. सुहास घाटगे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.


18364

रमेश दिवेकर यांची निवड
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा भटक्या विमुक्त जातीजमाती उपाध्यक्षपदी रमेश दिवेकर यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी निवडीचे पत्र दिले.


18367
जगमोहन भुर्के

जगमोहन भुर्के अध्यक्षपदी
कोल्हापूर : पार्वतीदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उजळाईवाडी (ता. करवीर) संस्थेची निवडणूक झाली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे मिलिंद ओतारी यांनी ही निवडणूक घेतली. निवडणूक बिनविरोध झाली. सदस्य असे : जगमोहन भुर्के, दत्ता अस्वले, चंद्रकांत चौगुले, धनंजय सरदेसाई, बाबगोंडा भोजकर, चंद्रकांत चव्हाण, बाबूराव कांबळे, कमरुद्दीन मुल्ला, रजनी कोळी, शोभा भोसले. संचालकांमधून संस्थचे अध्यक्ष म्हणून जगमोहन भुर्के, उपाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

कदंब पुरस्कारासाठी आवाहन
कोल्हापूर : ‘कदंब’ महोत्सवात कविता प्रकारात ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येतो. या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे असते. यंदा १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह या पुरस्कारासाठी पात्र असून कवींनी आपल्या कविता संग्रहाच्या दोन प्रती १५ मेपर्यंत पाठवाव्यात. कविता संग्रहावर कदंब पुरस्कारासाठी असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता संग्रह पाठवण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडार, महाद्वार रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन समितीने पत्रकाद्वारे केले आहे.


18374-मकरंद स्वामी,
18375 -ओंकार काशीद
मकरंद स्वामी अध्यक्षपदी
कोल्हापूर : संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती उत्सवच्या कार्यकारिणीची निवड झाली. यात मकरंद स्वामी यांची अध्यक्षपदी, तर कार्याध्यक्ष ओंकार काशीद, उपाध्यक्ष मुकीन मुश्रीफ, उपाध्यक्ष संदीप देसाई, सचिव जय नष्टे, सहसचिव संदीप कुंडले, खजानीस अर्जुन आंबी, ऑडिटर सम्राट यादव यांची निवड झाली. निवडी प्रसंगी दिगंबर फराकटे, अध्यक्ष नागेश घोरपडे, उपाध्यक्ष संदीप राणे, धनंजय सावंत, सुशील भांदिगरे, संदीप देसाई, अमोल डांगे, महावीर पोवार, संजय पाटील, गणेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

‘अवनि’तर्फे प्रमाणपत्र वितरण
कोल्हापूर : अवनि संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या लिंगभाव समानता, समानतेसाठी कृती प्रकल्पांतर्गत किशोरवयीन मुली आणि महिला यांच्यावरील हिंसाचार, भेदभाव रोखण्यासाठी लिंगभाव समानता प्रकल्प राबविला. कार्यक्रमांतर्गत १३ ते १७ वयोगटातील मुलींना आठवड्यातून एकदा लिंगभेदविषयी मार्गदर्शन केले.
उपक्रमात १५ घटकांचा समावेश आहे. मानवी अधिकार, लिंगभाव समानता, किशोरवयीन बदल, लिंगभाव व आरोग्य, लैंगिक हिंसाचार, हिंसाचार व पुरुषत्व, निकोप नातेसंबंध, समुपदेशन केले. ग्रामीण भागातील शाळा तसेच झोपडपट्टी वस्तीतील शाळा उपक्रमात सहभागी झाल्या. सर्व मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरवले. आनंदराव पाटील हायस्कूल चुयेचे मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी मुलांना किशोरवयीन बदलाविषयी मार्गदर्शन केले. बाल अधिकार मंचाचे विद्यार्थी समीक्षा, गौरी, चैतन्य यांनी मनोगत व्यक्त केले. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, प्रकल्प समन्वयक विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे, इम्रान शेख, जयश्री कांबळे उपस्थित होते.

कमला कॉलेजमध्ये पोस्टर स्पर्धा
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये सीनिअर विभाग वाणिज्य शाखेततर्फे विमाशास्त्र विषयावर जीवन विमा, सागरी विमा, अग्नी विमा, आरोग्य विमा आणि विमा नियमन विकास प्राधिकरण आधारित पोस्टर स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेत ८० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन केले. डॉ. निता धुमाळ, पूजा दुधगावकर, दत्तात्रय कमलाकर, ईश्वर पुजारी, प्रवीण चौगुले आणि विश्वनाथ तराळ उपस्थित होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रध्दा खोचगे, श्रावणी पाटील यांनी, तर द्वितीय क्रमांक राजनंदिनी डेळेकर, सारिका पाटील, राधिका येरणाळे, सानिका मगदूम तसेच तृतीय क्रमांक मोना मोहिते, हर्षदा हलकर्णीकर यांना मिळाला.डॉ. वर्षा मैंदर्गी, सचिन देठे यांनी आयोजन केले.


शाहू महाविद्यालयात ‘कॉमर्स कार्निवल’
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये कॉमर्स विभागातर्फे कॉमर्स कार्निवलचे आयोजन केले होते. कार्निवलचे उद्‌घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य डॉ. एम. बी. शेख, समितीचे सदस्य विक्रांत पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्या संगीता पाटील, प्रभारी प्राचार्य प्रा. व्ही. व्ही. किल्लेदार, कॉमर्स विभागप्रमुख डॉ. एस. एस. लवेकर, प्रा. डॉ. भाग्यश्री पुणतांबेकर आदी उपस्थित होते. या कॉमर्स कार्निवलमध्ये विद्यार्थ्यांकडून विविध खाद्यपदार्थ, शेतातील भाजीपाला, विविध फळे, धान्य, वस्तूंचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांत उद्योजकतेचा विकास व्हावा, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. दिवसभर अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेटी दिल्या.


२ कॉलम
--
18392
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयातील व्याख्यानात बोलताना प्रा. साधना झाडबुके.

महिलांनी कायद्याची माहिती
करून घ्यावी : प्रा. झाडबुके
कोल्हापूर : ‘‘समाजातील लोकांची मानसिकता दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलींचे अपहरण त्यांच्यावर होणारे बलात्कार, महिलांची असुरक्षिततेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. काही महिला अन्याय अत्याचार निमुटपणे सहन करतात. महिलांनी आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार सहन करू नयेत. पोलिसांत जाऊन तक्रार द्यावी. पोलिस स्टेशनला जाण्याची भीती वाटत असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. महिलांविषयी त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक शक्ती कायदे आहेत, या कायद्याची माहिती करून घ्यावी,” असे प्रतिपादन प्रा. साधना झाडबुके यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये महिला सचेतना समितीतर्फे ‘शक्ती कायदा’ यावर व्याख्यान झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार म्हणाले, “स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मुलींनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. कायद्याने मुलींना संरक्षण दिले आहे. महाविद्यालयांत, समाजामध्ये वावरताना अत्याचाराला बळी न पडता योग्य ठिकाणी तक्रार करावी.’’ समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. कन्नड़े यांनी स्वागत केले. डॉ. महेश रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. महिला सचेतना समितीच्या अध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी यांनी आभार मानले. कला शाखाप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री पुणतांबेकर आदी उपस्थित होते.
...

18395
कोल्हापूर : न्यू कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे डॉ. संजय जाधव यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

आत्मचरित्रे वाचनाने मनुष्य
अंतबाह्य बदलतो; डॉ. जाधव
कोल्हापूर : ‘‘शिक्षणापाठीमागचा नैतिक स्त्रोत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिगसारख्या शिक्षणसंस्थामधून निर्माण होतो,’’ असे सिल्कलँड ग्रुप दुबईचे सीईओ डॉ. संजय जाधव यांनी सांगितले. न्यू कॉलेज माजी विद्यार्थी संघ आणि न्यू कॉलेज आयोजित ‘करिअर निर्मिती : संधी आणि आव्हाने’ यावर व्याख्यान झाले.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘वाचनाचा आवाका वाढविल्यानंतर विचारांची शुद्धी होते. उत्तम आत्मचरित्रे वाचनाने मनुष्य अंतर्बाह्य बदलतो. जितके व्यक्तिमत्त्व विकसित होईल, तेवढी अभिजातता विकसित होते. प्रेरणा जेवढी अंतस्फूर्तीतून निर्माण होते, तेवढीच बाहेरील वातावरणातूनही प्राप्त होते. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे. येणारे दशक आणि शतक स्त्रियांचे आहे.’’ लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालक प्रा. विनय पाटील, जे. एस. कदम, विश्वास उनाके, उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख, डॉ. ए. ए. कलगौडा, डॉ. आर. डी. ढमकले, फत्तेसिंग सावंत, प्रकाश सरनाईक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अमर सासने यांनी माजी विद्यार्थी संघाविषयी माहिती दिली. उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर यांनी परिचय करून दिला. डॉ. मनीषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरूंधती पवार यांनी आभार मानले.


Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53767 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top