
मनपाचा सत्कार
18422
महापालिकेच्या वैद्यकीय
सेवेचा ‘सकाळ’कडून सन्मान
कोल्हापूर, ता. ३० : कोरोनाकाळात शहरवासीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेचा सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमात हेल्थ केअर ॲन्ड वेलनेस पुरस्कार देऊन सन्मान केला. माजी आरोग्य संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. महापालिकेतर्फे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. रथी अभिवंत, डॉ. विजय मुसळ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. महानगरपालिकेने कोरोना काळात शहरवासीयांसाठी विविध सुविधा दिल्या. कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी रुग्णालय, विलगीकरण केंद्र स्थापन केले. रुग्ण शोधमोहीम राबवून कोरोनाचा प्रसार रोखला. लसीकरणाला गती दिली. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. संकल्प अभियानाद्वारे पालक व विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीम राबविली. व्याधीग्रस्त व दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहीमही यशस्वीपणे राबविली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53873 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..