
निमशिरगावला रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन
निमशिरगावला रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन
डॉ. आनंद पाटील संमेलनाध्यक्ष : दमसा व शिवाजी विद्यापीठाचा सहभाग
दानोळी, ता.३ः निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे २८ व २९ मे रोजी यावर्षीचे रौप्यमहोत्सवी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील राहतील. दोन दिवसांच्या साहित्य संमेलनामध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ३२ वे साहित्य संमेलनही होत असून, यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभागही सहभागी होत आहे. निमशिरगाव येथे झालेल्या साहित्य सुधा मंचचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ही माहिती साहित्य सुधा मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील व कवी भीमराव धुळूबुळू, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी दिली.
संमेलनाची सुरुवात महादेव मंदिरातून ग्रंथदिंडीने होईल. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. परिसंवाद, कथाकथन, ज्येष्ठ साहित्यिकाची प्रकट मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, माजी अध्यक्षांचे अनुभव कथन, नाट्याविष्कार, नवोदितांचे कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53930 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..