दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु
दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु

दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

18549
दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु
१६ मे पासून मिळणार गरम, ताजा आहार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३० : राज्यातील अंगणवाड्या तब्‍बल दोन वर्षानंतर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार शुक्रवारपासून (ता.२९) अंगणवाड्या सुरु झाल्या आहेत. कोरोनामुळे राज्यातील अंगणवाड्या मार्च २०२० बंद केल्या होत्या. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्‍हा अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. सध्या मुलांना घरीच आहार दिला जात आहे. मात्र १६ मेपासून अंगणवाडीतगरम व ताजा आहार द्यावा,असा आदेश आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
विभागाकडून आहार पुरवठ्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्‍त झाल्या आहेत. त्यानुसार १६ मार्च ते १५ मे या दोन महिन्यांच्या कालावधीत ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी गरम ताजा आहाराऐवजी टीएचआर या घरपोच आहाराची मागणी फेडरेशनकडे नोंदवण्याबाबत सूचना आहेत. नागरी भागात ९ ऑगस्‍ट २०१९ च्या निविदेनुसार आहार पुरवठा करण्यासाठी महिला मंडळ, बचत गटांची निवड झाली आहे. त्यांच्यामार्फत गरम व ताजा आहार सुरु केला जाणार आहे. तर निविदा अटी शर्तीनुसार प्रत्यक्ष पुरवठा आदेश दिल्यापासून दोन वर्षांसाठी हे आहार पुरवठ्याचे काम देण्याच्या सुचना आहेत. तर ज्या ठिकाणी महिला मंडळ, बचत गटाची निवड झालेली नाही त्या ठिकाणी ज्यांचे मार्फत या निविदेपुर्वी आहार पुरवठा केला जात होता, त्यांच्यामार्फतच आहार पुरवठा सुरळित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
ज्या बचत गटांनी आहाराचे काम बंद केले आहे, त्या ठिकाणी कच्‍चे धान्य, किराणा मालाचा पुरवठा हा पर्यायी व्यवस्‍थेअतंगर्त करण्यात येत होता. आता यात बदल करुन कच्‍चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा आदेश तात्‍पुरत्या स्‍वरुपात कंझ्युमर्स फेडरेशनकडून देण्यात याद्यावा, असेही पत्रात म्‍हटले आहे.

सेविका, मदतनीस यांना सुटटी
कोरोना काळात अंगणवड्या बंद होत्या. मात्र दोनच दिवसापुर्वी अंगणवाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व सुटट्या पुढील काळात देणे शक्य नसल्याचे आयुक्‍तालयाने म्हटले आहे. परिणामी मदतनीसांना २ ते ८ मे या कालावधीत सुटटी दिली आहे. तर ९ ते १५ मे या कालावधीत अंगणवाडी सेविकांना उन्‍हाळी सुटी मंजूर केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53939 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top