
संक्षिप्त पट्टा
01059
शिवराज्य भवनसाठी
५० लाख मंजूर : सत्यजित पाटील
सरूड : खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीनुसार मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे शिवराज्य भवन बांधणे या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मलकापूर या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवराज्य भवन व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याचा पाठपुरावा करत खासदार धैर्यशील माने यांनी मागील चार महिन्यांपासून या कामासाठी निधी मंजुरीसाठी प्रयत्न करीत होते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलकापूर येथे शिवराज्य भवन बांधण्याच्या कामाच्या पहिल्या टप्प्यास ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
रॉबीन हूड आर्मीचा पाचवा वर्धापन दिन
कोल्हापूर ः ‘भुकेल्यांसाठी अन्न'' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या येथील रॉबीन हूड आर्मीचा पाचवा वर्धापन दिन आज साजरा झाला. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या आणि दानशूर कोल्हापूरकरांच्या बळावरच येत्या काळातही उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त झाला. एखाद्या कार्यक्रमात शिल्लक राहिलेले अन्न टाकून न देता ते उपाशी गरजू लोकांपर्यत पोहोचवण्याचं किरकोळ असे दिसणारे पण हेच मुख्य काम करत असलेल्या या संस्थेने जगभरात सात वर्षात सव्वा आठ कोटींहून अधिक लोकांना अन्न वाटप केले आहे आणि कोल्हापूरमध्ये गेल्या पाच वर्षात ६ लाख लोकांना अन्नदान केले आहे. याचबरोबर ऊस तोडणी मजुरांना ब्लँकेट वाटप, रक्तदान शिबिर तसेच शिक्षणापासून वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासोबत त्यांची शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे, यासाठी संस्था कार्यरत आहे.
18562
चौगुले पतसंस्थेला डॉ. लहाने यांची भेट
कोल्हापूर ः येथील वसंतराव चौगुले पतसंस्थेला प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ पद्यश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेचे संस्थापक अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. लहाने यांच्यासोबत जे. जे. रुग्णालयाच्या नेतत्ररोग तज्ज्ञ डॉ. रागिणी पारेख होत्या. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. लहाने काल (ता. २९) कोल्हापुरात आले होते. सायंकाळी त्यांनी वसंतराव चौगुले पतसंस्थेला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी त्यांना संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. यावेळी संस्थेतर्फे डॉ. लहाने व डॉ. पारेख यांचा शाळ, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. संस्थेचे व्यवस्थापक वसंतराव चव्हाण व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53994 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..