रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

-शिल्पसौंदर्य
--


18522
देशाचा स्वातंत्र्य दिन
अन् अर्ध शिवाजी पुतळा
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक पुतळे साऱ्यांना नेहमीच सळसळती प्रेरणा देतात. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळाही त्यापैकीच एक. पुतळ्याकडे बारकाईने पाहिल्यानंतर अंगामध्ये रेषा-रेषांचे व काठाला नक्षी असणारी बाराबंदी धारण केली असून, मजबूत गळ्या दाखवताना शिल्पकारांनी कवड्याची माळ आणि कानामध्ये कुंडले दाखवली आहेत. सुती कापडाचा डोक्यावरील घट्ट बांधलेला मंदिल, मागे डौलदार तुरा आणि मोत्याचा गोंडा दाखवला आहे. बोल्ड उठावात चेहरा घडवताना शिल्पकारांनी अत्यंत धीट भाव आणि भेदक नजर साकारली आहे. कलाक्षेत्रात कलामहर्षी या नावाने ज्यांचा आदरपूर्वक गौरव केला जातो. त्या बाबूराव पेंटर यांनी स्वतः शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली असल्यामुळे शिव छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्‍वामधील आक्रमक धैर्य आणि शूर मुद्रा या शिल्पाच्या आकृतीबंधामध्ये साधली आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी कोनशिला स्थापित केली असून काळ्या पाषाणातील अष्टकोनी पायावर निमुळत्या होत जाणाऱ्या सफेद चौथऱ्यावर हा पुतळा शिवाजी तरुण मंडळामार्फत १५ ऑगस्‍ट १९४७ रोजी श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांच्या हस्ते अनावरण होऊन करवीरकर जनतेला समर्पित केला आहे. शिवाजी पेठेतील लोकांनी या पुतळ्याच्या आवाराला मोठ्या आत्मीयतेने जपले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53995 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top