चला, चिमण्या वाचवूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला, चिमण्या वाचवूया
चला, चिमण्या वाचवूया

चला, चिमण्या वाचवूया

sakal_logo
By

18538
चिमण्यांसह पक्ष्‍यांसाठी
घरटी, जलपात्रांचे वितरण
--
‘चला, चिमण्या वाचवूया उपक्रम’, जैन सोशल ग्रुपचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : ‘सकाळ’च्या ‘चला, चिमण्या वाचवूया’ मोहिमेंतर्गत आज जैन सोशल ग्रुपतर्फे चिमणी व पक्ष्‍यांसाठी घरटी आणि जलपात्रांचे वितरण झाले. शाहूपुरी कुंभार गल्लीतील सुनंदा वडणगेकर यांच्यासह विद्यार्थी, रघुनाथ कांबळे आदींना प्रातिनिधिक स्वरूपात घरटी व जलपात्रे दिली. दरम्यान, हा उपक्रम आता लोकचळवळच बनला असून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून घरटी व जलपात्रांचे वितरण होऊ लागले आहे. जैन सोशल ग्रुपने येत्या काळातही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा संकल्प केला आहे.
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘चिमण्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यानंतर ‘सकाळ’ने मोहीम हाती घेतली आणि पुढे ती लोकचळवळच बनली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. घरटी किंवा जलपात्रे वितरण हे एक निमित्त असून या माध्यमातून चिमण्या आणि इतर पक्ष्‍यांच्या संवर्धनासाठीचा जागर आणि विविध कृती कार्यक्रमांवर भर दिला जातो आहे. विविध संस्थांचा सातत्याने सक्रिय सहभाग ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’’
अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल म्हणाले, ‘‘समाजातील एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ''ने पुढाकार घेतल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. केवळ चिमण्या, रंकाळाच नव्हे तर पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची चळवळ ‘सकाळ''मुळेच अधिक व्यापक झाली आहे.’’
जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जू कटारिया म्हणाल्या, ‘सकाळ’च्या विविध सामाजिक उपक्रमात आम्ही नेहमीच सहभागी असतो. चिमण्या व इतर पक्ष्‍यांसाठीच्या उपक्रमात येत्या काळातही सक्रिय योगदान दिले जाईल.’’
कार्यक्रमाला ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, मुख्य बातमीदार निवास चौगले, पर्यावरणतज्‍ज्ञ उदय गायकवाड, वनेचंद कटारिया, अशोक जैन, अनिलभाई शहा आदी उपस्थित होते. ज्यांना घरटी व जलपात्रे हवी असतील त्यांनी ९२८४६९३८४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54029 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top