
ऑल इंडिया युथ फेडरेशन निदर्शने
18547
सरळ सेवा भरती झालीच पाहिजे
ऑल इंडिया यूथ फेडरेशन आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.३०ः‘नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या, सरळ सेवा भरती झालीच पाहिजे, अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. ऑल इंडिया यूथ फेडरेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘शिक्षक भरती झालीच पाहिजे, टीईटी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी आज निदर्शने केली. मागण्या मान्य न केल्यास पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल, असाही इशारा दिला.
केंद्र सरकारचे व राज्य सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत आहे. राज्य सरकारकडे सर्वसाधारण ३ लाखाहून अधिक जागा व शिक्षकांच्या ५० हजार जागा रिक्त आहेत. केंद्र सरकारकडे २४ लाखहून अधिक जागा रिक्त आहेत. सरकार काही जागा भरत आहेत, पण तेथे घोटाळे होत आहेत. या धोरणाचा निषेध करण्यासाठी निदर्शने केल्याचेही संघटनेचे गिरीश फोंडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सहसचिव राम करे, सुनील पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष रवी जाधव, भक्ती पाटील, , सौम्या भिलतीया, आकाश कांबळे, ज्ञानेश्वर आडनाईक, फईद सय्यद, हर्ष यमुलेकर उपस्थित होते.
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54038 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..